बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा दणक्यात पार पडला. या दोघांच्या साखरपुड्यासाठी नातेवाईक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली. त्या दोघांच्या साखरपुड्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा उपस्थित होती. तिने परिणितीला खास फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा भारतात परतली. त्या दोघांच्या साखरपुड्याचे खास फोटो प्रियांकाने पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा : Made For Each Other! परिणिती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का?

यातील पहिल्या फोटो हा राघव आणि परिणितीचा आहे. तर दुसऱ्या फोटोत प्रियांका ही संपूर्ण कुटुंबाबरोबर फोटो काढताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोत ती तिच्या भावाबरोबर उभी असल्याचे दिसत आहे. तसेच चौथ्या फोटोत राघव आणि परिणिती हे प्रार्थना करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

परिणितीच्या लग्नासाठी प्रियांकाने इंडो-वेस्टर्न लूक केला होता. तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. पण त्याला तिने वेस्टर्न लूक दिला होता. हे फोटो पोस्ट करताना तिने खास कॅप्शन दिले होते.

आणखी वाचा : “अखेर ती ‘हो’ म्हणाली…” परिणिती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचा पहिला फोटो अखेर समोर

“अभिनंदन तिशा आणि राघव… आता आम्ही लग्नाची वाट पाहतोय! तुम्हा दोघांसाठी आणि कुटुंबासाठी मी खूप आनंदी आहे. त्याबरोबरच कुटुंबाला पुन्हा भेटून फारच मज्जा आली”, असे प्रियांकाने म्हटले आहे.

दरम्यान प्रियांकाची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिने परिणितीला तिशा असे म्हटले आहे. यावरुन अनेक नेटकऱ्यांनी याबद्दल कमेंट करत प्रश्न विचारला आहे. तर काहींनी निक आणि मालती कुठेय? असा प्रश्नही तिला विचारला आहे.