Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले आहे. त्यांनी उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नासाठी अनेक सेलिब्रिटी आणि राजकारण्यांनी उदयपूरला हजेरी लावली. या जोडप्याने अद्याप लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत, पण त्यांच्या रिसेप्शनमधील एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये दोघेही कमालीचे सुंदर दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी लग्नासाठी उदयपूरचीच का निवड केली? ‘या’ व्यक्तीने सुचवलं होतं नाव

परिणीती व राघव यांचा लग्नानंतर पती-पत्नी म्हणून पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये परिणीतीने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली आहे आणि हातात त्याच रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. तर गळ्यात तिने एक मोठा नेकलेस घातला होता आणि केस मोकळे सोडले होते. तिने मेकअपही अगदीच साधा केला होता. या फोटोत तिच्या कपाळावर कुंकू दिसत आहे. दुसरीकडे राघवने काळ्या रंगाचा सूट घातला होता.

दोघांच्याही फोटोवर चाहते कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षावर करत आहेत. त्यांचा साधेपणा पाहून चाहते भारावले आहेत. जास्त मेकअप नाही, भरजरी कपडे नाही, अगदी साध्या रिसेप्शन लूकचं चाहते कौतुक करत आहेत. दोघांचेही फोटो ‘विरल भयानी’च्या अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत.

परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या संगीत सोहळ्यातला व्हिडीओ व्हायरल; नवराज हंसच्या गाण्यावर पाहुण्यांचा जबरदस्त डान्स

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला परिणीती व राघव मुंबईत एकत्र दिसले होते, दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. दोघांनी मे महिन्यात दिल्लीमध्ये साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याला अभिनेत्री प्रियांका चोप्रा व तिचा पती निक जोनस खास अमेरिकेहून आले होते. पण राघव परिणीतीच्या लग्नाला मात्र वधूची बहीण म्हणजेच प्रियांका उपस्थित राहू शकली नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parineeti chopra raghav chadha first photo after marriage is out looking simple in reception look hrc