राघव चड्ढा व परिणीती चोप्रा यांनी रविवारी (२४ सप्टेंबर रोजी) उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. दोघांनी सोमवारी सकाळी लग्नाचे फोटो शेअर केले. त्यानंतर आता पहिल्यांदाच दोघेही माध्यमांसमोर आले आहेत. परिणीती व राघव लग्नानंतर उदयपूरहून जाण्यासाठी निघाले, तेव्हाचा त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.
‘वूम्पला’ने शेअर केलेल्या व्हिडीओत राघव चड्ढा पांढरे शर्ट आणि काळ्या पँटमध्ये दिसत आहेत. तर, परिणीतीने निळ्या जीन्सवर गुलाबी रंगाचे कफ्तान घातले आहे. परिणीती आणि राघव दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच ते माध्यमांसमोर आले, तेव्हाचा हा त्यांचा व्हिडीओ आहे.
दरम्यान, आप नेते राघव व बॉलीवूड अभिनेत्री परिणीती या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईत एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली. दोघांनी मे महिन्यात दिल्लीत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता त्यांनी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली.
राघव व परिणीतीच्या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. तसेच मनीष मल्होत्रा, सानिया मिर्झा, प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा हे देखील उपस्थित होते.