बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा सध्या त्यांच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहेत. दोघांच्या नात्याबाबत, लग्नाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. आप नेते संजीव अरोरा यांनी त्यांचे अभिनंदन केल्यावर त्यांच्या नात्याला दुजोरा मिळाला. यानंतर परिणीतीचा को-स्टार हार्डी संधूनेही दोघांचं अभिनंदन केलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ओम राऊत ड्रग्ज घेतो”; ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील ‘ती’ चूक पाहून संतापले नेटकरी, म्हणाले, “सीता मातेच्या…”

‘ई-टाइम्स’च्या एका विशेष रिपोर्टनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी एकत्र शिक्षण घेतलं, पण त्यांची प्रेमकहाणी अलीकडेच सुरू झाली. दोघांची पंजाबमध्ये भेट झाली. परिणीती तिथे शूटिंग करत होती, तेव्हा दोघेही एकमेकांना भेटले आणि त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. मात्र, त्यांचे नाते किती जुने आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. पण रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर दोघेही किमान सहा महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ही चर्चा लग्नापर्यंत पोहोचल्याचं वृत्तही त्यांनी दिलं आहे.

परीक्षकांकडून झुकते माप, ट्रोलिंग अन्… ; ‘MasterChef India’ मध्ये झालेल्या आरोपांवर अरुणा विजय म्हणाली, “माझ्यावर खूप…”

दरम्यान, परिणीती चोप्राची बहीण व प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनस व लेकीबरोबर भारतात आली आहे. काहींच्या मते, ती तिची वेब स्टोरी ‘सिटाडेल’च्या प्रमोशनसाठी आली आहे, तर काहींच्या मते ती परिणीती व राघवच्या लग्नासाठी भारतात परतली आहे. पण अद्याप राघव-परिणीच्या नात्याबद्दल किंवा प्रियांकाच्या भारतात येण्याच्या कारणाची खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parineeti chopra raghav chadha love story both met in punjab first time hrc