बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण आज दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये आज या शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. संगीत सोहळ्यातील एक इनसाइड व्हिडीओ समोर आला आहे. (Raghav Parineeti Wedding)

हेही वाचा – ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? करायची मॅकडोनाल्डमध्ये काम

actor Parvin Dabas in ICU after road accident
बॉलीवूड अभिनेता परवीन डबासचा भीषण अपघात, डोक्याला गंभीर दुखापत, ICU मध्ये असल्याची पत्नीने दिली माहिती
kareena kappor saif ali khan omkara
स्वतःचा अभिनय दाखवायला करीना कपूरने ठेवलेला चित्रपटाचा खास…
saiyami kher completes ironman Triathlon
अभिनेत्री सैयामी खेरची मोठी कामगिरी, आयर्नमॅन ७०.३ शर्यत केली पूर्ण; अनुराग कश्यपने शेअर केली पोस्ट
Sussanne Khan brother Zayed Khan gave Money Management Tips after flop Film Career
फ्लॉप करिअर तरीही १५०० कोटींची संपत्ती? सुझान खानच्या भावाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया; म्हणाला, “आयुष्यात काही मूर्ख लोक…”
Abhishek Bachchan bought a luxury apartment in Mumbai two months after buying 6 flats
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिषेक बच्चनने ‘जलसा’च्या शेजारी घेतली मालमत्ता, दोन महिन्यांपूर्वी खरेदी केले होते फ्लॅट्स
Vivek Oberoi talks about ex girlfriends
“मी मनापासून प्रेम केलं,” विवेक ओबेरॉयचं वक्तव्य; म्हणाला, “माझ्या लग्नात एक्स गर्लफ्रेंड्स…”
sridevi wanted to work with amar singh chamkila
दिवंगत श्रीदेवींना ‘या’ लोकप्रिय गायकासह करायचा होता चित्रपट, हिंदी शिकवण्याची ऑफरही दिलेली पण…
Vikrant Massey film 'The Sabarmati Report new release date
विक्रांत मॅस्सीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ला अखेर मिळाली रिलीज डेट, दोनदा पुढे ढकललंय प्रदर्शन
Tumbbad re release Box Office collection
पुन्हा प्रदर्शित झाल्यावर ‘तुंबाड’ची जबरदस्त कमाई, ६ वर्षांपूर्वीच्या मूळ कलेक्शनला टाकलं मागे

परिणीती-राघव यांच्या संगीत सोहळ्यातील इनसाइड व्हिडीओ परिणीतीच्या इन्स्टाग्राम फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, लोकप्रिय पंजाबी गायक नवराज हंस गाताना दिसत आहे. ‘दिल चोरी साडा हो गया’ आणि ‘गुड नाला इश्क मिठा’ अशी गाणी गाताना नवराज पाहायला मिळत आहे. यावेळी पाहुणे मंडळी एन्जॉय करताना दिसत आहे.

हेही वाचा – ‘तुझी आवडती सेलिब्रिटी कोण?’; गौतमी पाटीलनं दिलं कौतुकास्पद उत्तर, म्हणाली…

हेही वाचा – Bigg Boss 17: अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी ‘बिग बॉस सीझन १७’चं दार उघडणार, सलमान खानने नव्या प्रोमोमधून केलं जाहीर

परिणीती-राघव यांच्या लग्नासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दोघं आपल्या पत्नीसह काल उदयपूरमध्ये दाखल झाले. यावेळी राघव चड्ढा यांच्या कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं.

दरम्यान, कॉलेजमध्ये असताना परिणीती आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट झाली होती. जेव्हा दोघांना इंग्लंडमध्ये इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं. पण त्यांची प्रेम कहाणी २०२२पासून सुरू झाली. परिणीतीच्या ‘चमकीला’ या पंजाब चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पुन्हा दोघांची भेट झाली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.