Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : अभिनेत्री परिणीती चोप्रा व आप नेते राघव चड्ढा यांच्या लग्नसोहळ्याच्या विधींना सुरुवात झाली आहे. दोघेही त्यांच्या कुटुंबीयांबरोबर शुक्रवारी उदयपूरला पोहोचले. उदयपूरमधील द लीला पॅलेसमध्ये त्यांचं लग्न उद्या (२४ सप्टेंबर रोजी) होणार आहे.

राघव-परिणीतीच्या लग्नाचा शाही थाट! विवाहस्थळ असलेलं ‘द लीला पॅलेस’ पाहिलंत का? भाडं तब्बल…

kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो

परिणीती व राघव दोघेही पंजाबी आहेत. या राजस्थानमध्ये दोघांचं लग्न होत आहे. या दोघांच्या लग्नात कोणते पदार्थ असतील, याबाबत माहिती समोर आली आहे. ‘बॉलीवूड लाइफ’मधील एका रिपोर्टनुसार, परिणीती चोप्राने तिचे भाऊ, शिवांग आणि सहज यांच्याबरोबर मिळून लग्नाच्या जेवणाचा मेनू निवडला. पाहुण्यांसाठी खास राजस्थानी आणि पंजाबी खाद्यपदार्थांसह विविध भारतीय पदार्थ बनवण्यात येणार आहे.

परिणीती आणि तिच्या भावंडांनी कुटुंबातील वृद्ध सदस्यांच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन जेवण निवडले आहे. पाहुण्यांसाठी राजस्थानी व पंजाबीसह इतर अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ असतील. दरम्यान, या लग्नासाठी गेलेल्या पाहुण्यांना तिथे फोटो काढण्याची परवानगी नाही. कोणीही फोटो काढू नये म्हणून फोनच्या कॅमेऱ्यांवर एका विशिष्ट प्रकारचे स्टिकर्स लावण्यात आले आहेत.

दरम्यान, परिणीती व राघव यांनी १४ मे रोजी साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याला अनेक दिग्गज राजकारण्यांसह कलाकारांनीही हजेरी लावली होती. या साखरपुड्यासाठी परिणीतीची बहीण व बॉलीवूड अभिनेत्री प्रियांकादेखील पती निक व लेकीसह भारतात आली होती. पण प्रियांका लग्नाला हजेरी लावणार की नाही, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Story img Loader