बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २४ सप्टेंबरला आणि राघव चड्ढा लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. उदयपूरच्या ताज लेक पॅलेसमध्ये हा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. परिणीती आणि राघव चड्ढा (Raghav Parineeti Wedding) आपल्या कुटुंबियांबरोबर उदयपूरला पोहोचले आहेत. यासंबंधितचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या शाही लग्नसोहळ्याला बॉलीवूड आणि राजकारणातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची नाव आमंत्रित केलेल्या पाहुण्यांच्या यादीमध्ये आहेत. तसेच परिणीतीकडून देखील बॉलीवूडचे सेलिब्रिटी लग्नाला हजर राहणार आहेत. मात्र परिणीतीची बहिण प्रियांका या लग्नाला गैरहजर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- ‘जवान’मध्ये कमी स्क्रीन टाईम मिळाल्यामुळे नयनतारा नाराज, प्रतिक्रिया देत शाहरुख खान म्हणाला…
प्रियांकाने सोशल मीडियावर परिणीतीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे त्यावरुन ती परिणीतीच्या लग्नाला येणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. प्रियांकाने परिणीतीच फोटो इन्स्टाग्राव स्टोरीला पोस्ट करत लिहिलं आहे. “मला आशा आहे की तू तुझ्या आयुष्यातील महत्वाच्या दिवशी तितकेच आनंदी आणि समाधानी असशील. नेहमीच खूप प्रेम.”
उदयपूरमधील ताज पॅलेसमध्ये परिणीती आणि राघव यांचा शाही लग्नसोहळा असणार आहे. या लग्नसोहळ्याची सुरुवात दिल्लीत सूफी नाइट्स आणि अरदासपासून सुरू झाली. आता आज, २३ सप्टेंबरला संगीताचा कार्यक्रम होणार आहे. या लग्नसोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना फोन वापरण्यास मनाई केली आहे.
हेही वाचा- रणबीर कपूरने भाड्याने दिला त्याचा पुण्यातील आलिशान फ्लॅट, एका महिन्याचं भाडं वाचून व्हाल थक्क
दरम्यान, परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच ‘मिशन रानीगंज’मध्ये झळकणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर पुन्हा एकदा अक्षय कुमार पाहायला मिळणार आहे. तसेच कुमुद मिश्रा आणि रवि किशन देखील महत्त्वाचा भूमिकेत आहेत. जयवंत सिंह गिल यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. ६ ऑक्टोबर ‘मिशन रानीगंज’ प्रदर्शित होणार आहे.