बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. परिणीती आणि राघव यांनी १३ मे रोजी साखरपुडा करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला. दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी त्यांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. आता त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे.

इन्सटंट बॉलिवूडने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राघव चड्ढा यांच्या लग्नाचे रिसेप्शन कुठे होणार याचं आमत्रंण समोर आले आहे. ही आमंत्रण पत्रिका फारच सुंदर आहे.
आणखी वाचा : “१० वर्षांपूर्वी घराची नोंदणी केली, पण…”, शशांक केतकरची मोठी फसवणूक; म्हणाला “बिल्डरला…”

Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Kolhapur divorce women defraud and raped by fake groom
विवाह नोंदणी संकेतस्थळावरून घटस्फोटित महिलेशी ओळख, लग्नाचे वचन देत ११ लाख रुपये लुटले; आरोपी फिरोज शेखला अटक
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
True love Viral Video
‘बायको, तू फक्त साथ दे..’ खऱ्या प्रेमाचं उदाहरण दाखविणारा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी

या पत्रिकेवर त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची नाव लिहिण्यात आली आहेत. त्याखाली राघव आणि परिणीती हे नाव पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच परिणीतीच्या आई-वडिलांचेही नाव दिसत आहे.

परिणीती आणि राघव यांचे लग्नाच्या रिसेप्शनचे निमंत्रण पत्र पांढऱ्या रंगात पाहायला मिळत आहे. त्यावर सोनेरी रंगाची डिझाईन आहे. येत्या ३० सप्टेंबरला ताज चंदीगड या ठिकाणी लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. हे रिसेप्शन दुपारच्या वेळी असणार आहे.

आणखी वाचा : “हार्ट फेल्युअरचा त्रास, शरीरात पाणी वाढतंय अन्…”, मराठी अभिनेत्रीच्या बहिणीला झालाय गंभीर आजार, म्हणाली “१५ ते २० लाखांचा…”

दरम्यान परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा येत्या २५ सप्टेंबरला लग्नगाठ बांधणार असल्याचे चर्चा सुरु आहे. काही मीडिया रिपोर्ट्सने नमुद केल्याप्रमाणे, उदयपुरमधील ओबेरॉल उदयविलास रिसॉर्टमध्ये दोघंही लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पिछोला लेकच्या किनारी हे पंचतारांकित हॉटेल आहे. रिसॉर्ट अगदी महागडं आहे.

Story img Loader