बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. २४ सप्टेंबरला परिणीतीने ‘आप’ नेते राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. राजस्थानच्या उदयपूरमध्ये दोघांच्या शाही विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर परिणीती मालदिव ट्रीपवर गेली आहे. परिणीतीने या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअऱ केले आहेत.
हेही वाचा- ‘अॅनिमल’मध्ये बॉबी देओल दिसणार नरभक्षकाच्या भूमिकेत? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण
लग्नानंतर परिणीती आणि राघव हनिमूनला कुठं जाणार याची चांगलीच चर्चा रंगली होती. पण दोघांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांनी हनिमूनचा योजना रद्द केल्याच सांगण्यात आलं होतं. मात्र, परिणीती आता गर्ल्स गॅंगबरोबर मालदिवमध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने याचा कही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.
हेही वाचा- ‘या’ कारणामुळे ‘कुछ कुछ होता है’च्या प्रदर्शनाच्या दिवशी करण जोहरला देशाबाहेर जावं लागलं होतं
परिणीती आपल्या सासरच्या लोकांबरोबर मालदिवला फिरायला गेली आहे. परिणीतने याचा एक फोटोही आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये परिणीती स्विमिंग पूलमध्ये उभारलेली दिसून येत आहे. परिणीतीच्या हातात गुलाबी रंगाचा चुडा आणि समोर अथांग समुद्र दिसत आहे. परिणीतीने फोटो शेअर करत लिहिलं आहे. “मी हनिमूनला आली नसून हा फोटो माझ्या नणदेने किल्क केला आहे”. या फोटोनंतर परिणीती राघव चड्ढा यांच्या बहिणीबरोबर मालदिवला गेली असल्याचे समोर आलं आहे. राघव चड्ढा यांची छोटी बहीण सीए आहे.
परिणीतीच्या वर्कफ्रंडबाबत बोलायचं झालं तर नुकताच तिचा मिशन रजनीगंज चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात परिणीतीबरोबर अक्षय कुमारची मुख्य भूमिका होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली जादू दाखवण्यात अपयशी ठरला. आता परिणीतीचे ‘लाइफ इन अ मेट्रो’ आणि ‘चमकिला’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.