अभिनेत्री परिणीती चोप्राने अभिनय क्षेत्रासह तिच्या संगीत क्षेत्रातही पदार्पण केलं. अभिनय क्षेत्रातून संगीत क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या परिणीतीचा पहिला लाइव्ह परफॉर्मन्स मुंबईत पार पडला होता. रविवारी, २८ जानेवारी रोजी मुंबई फेस्टिवल २०२४ मध्ये सहभाग घेत तिने आपला पहिला लाईव्ह परफॉर्मन्स सादर केला होता.

आता परिणीतीचा ‘अमर सिंग चमकिला’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यात परिणीती आणि दिलजीत दोसांझ यांनी हजेरी लावली होती.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
priyanka chopra
लेक आणि पतीसह प्रियांका चोप्राची न्यूयॉर्क ट्रिप! चिमुकल्या मालतीला लावली खोटी नखं; फोटो व्हायरल

‘अमर सिंग चमकिला’ चित्रपटाच्या लॉंच सोहळ्यात परिणीतीने काळ्या रंगाचा कफ्तान ड्रेस परिधान केला होता. यापूर्वी परिणीती गरोदर असल्याच्या चर्चा अनेकदा समोर आल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे आणि त्याचं कारण ठरलं परिणीतीचा काळा कफ्तान ड्रेस.

हेही वाचा… “आपल्या आयुष्यातून निघून गेलेली माणसं…”, कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट; नेटकरी म्हणाले, “चला हवा येऊ द्या…”

अभिनेत्रीने या सोहळ्यात परिधान केलेल्या या काळ्या ड्रेसवरून सगळेच तर्क वितर्क लावू लागले आणि परिणीती प्रेग्नंट आहे का अशा चर्चा रंगल्या. ट्रेलर लॉंच सोहळ्यातील परिणीतीचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या व्हायरल झालेल्या फोटोंचे परिणीतीने मजेशीर उत्तर देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

परिणीतीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली, ज्यात मजेशीर पद्धतीने असं लिहिलं होतं की, “कफ्तान ड्रेस- प्रेग्नन्सी, ओव्हरसाईज्ड शर्ट- प्रेग्नन्सी, पारंपरिक कुर्ता- प्रेग्नन्सी” यापुढे हसण्याचं इमोजी वापरत परिणीतीने प्रेग्नन्सीसंदर्भात पसरणाऱ्या अफवांना पूर्णविराम दिला. परिणीतीची ही स्टोरीदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा… लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने पती सिद्धेशने बनवला पूजा सावंतसाठी खास पदार्थ; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, परिणीतीच्या आगामी चित्रपटाबाबत सांगायचं झालं तर ‘अमर सिंग चमकिला’ या चित्रपटात परिणीती झळकणार आहे; तर दिलजीत दोसांझ यात मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट अमर सिंग चमकिला यांच्या जीवनावर आधारित असून १२ एप्रिल २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader