परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही विवाहसोहळा २४ सप्टेंबरल उदयपूरमध्ये पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या जोडप्याच्या लग्नातील सुंदर फोटोंवर बॉलीवूड सेलिब्रिटींसह राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. परिणीती-राघवच्या लग्नानंतर दोघेही हनिमूनला कुठे जाणार याची चर्चा रंगली होती. परंतु, काही दिवसांनी चित्रपटाच्या शूटिंगचं व्यग्र वेळापत्रक आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनमुळे राघव-परिणीतीने बाहेर फिरायला जायची योजना रद्द केल्याचं वृत्त समोर आलं.

हेही वाचा : कतरिना कैफने टॉवेल गुंडाळून केली जबरदस्त अ‍ॅक्शन, ‘टायगर ३’मधील ‘तो’ सीन इंटरनेटवर व्हायरल, नेटकरी म्हणाले…

Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

परिणीती चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. लग्नानंतर ती पहिल्यांदाच मालदिव फिरायला गेली आहे. परंतु, मालदिवच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी परिणीती पती राघव चड्ढांबरोबर नव्हे तर तिच्या मैत्रिणींबरोबर ‘गर्ल्स ट्रिप’ला गेली आहे. मालदिवचं रिसॉर्ट, निळाशार समुद्रकिनारा याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा : स्विमसूट, डोळ्यांवर गॉगल, अन्…; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड लूकने वेधलं लक्ष, स्विमिंगपूलमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

parineeti chopra
परिणीती चोप्रा

मालदिवचे फोटो पाहून हनिमूनच्या चर्चा रंगू नयेत याची परिणीतीने पूर्णपणे खबरदारी घेतली आहे. या फोटोंना “मी हनिमूनला आलेली नाही ही आमची गर्ल्स ट्रिप आहे” असं कॅप्शन अभिनेत्रीने दिलं आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये परिणीतीच्या हातात कॉफीचा कप, लग्नाचा गुलाबी रंगाचा चुडा आणि सुंदर असा समुद्रकिनारा पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “त्याने चुकीच्या पद्धतीने हात लावला…”, मराठी अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “त्या क्षणी…”

parineeti
परिणीती चोप्रा

परिणीतीने अलीकडेच ‘लॅक्मे फॅशन वीक २०२३’मध्ये रॅम्पवॉक केला होता. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदा वॉक करताना परिणीतीने पेस्टल रंगाची साडी, गळ्यात हार, कपाळावर कुंकू, हातात चुडा असा लूक केला होता. लवकरच अभिनेत्री ‘चमकिला’ आणि ‘लाइफ इन अ मेट्रो’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

Story img Loader