अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुलगी मालती मेरीसोबत भारतात येत आहे. यामुळे प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्रा खूप खूश आहे. परिणीतीची भाची मालती मेरी हिच्या स्वागतासाठी तिने सर्व तयारी केली आहे. कारण मालती पहिल्यांदाच परिणीतीच्या घरी येणार आहे. प्रियांका आणि मालती बरोबर वेळ घालवण्यासाठी परिणीती उत्सुक आहे. यासाठी तिने दिवस खास प्लॅन्सही आखले आहेत.

आणखी वाचा : Video: चित्रीकरणादरम्यान अभिनेता टायगर श्रॉफला गांभीर दुखापत, व्हिडीओ पाहून नेटकरी काळजीत

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत

अलीकडेच परिणीतीने एका संभाषणादरम्यान प्रियांका चोप्रा, भाची मालती मेरी आणि मेव्हणा निक जोनासबद्दल सांगितले. यावेळी बोलताना मालतीबरोबर ती खूप खेळणार असल्याचे तिने जाहीर केले. त्यासोबतच परिणीतीला मालतीला एक खास चित्रपट दाखवायचा असल्याचे तिने सांगितले. हा चित्रपट म्हणजे परिणीतीचा ‘हसी तो फसी’ आहे. तसेच हा चित्रपट दाखवण्याचे स्पष्ट तिने स्पष्ट केले आहे.

परिणीतीला नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान “तुला मालतीला कोणता चित्रपट दाखवायला आवडेल?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने क्षणाचाही विलंब न करता ‘हसी तो फसी’ या चित्रपटाचे नाव घेतले. त्यासोबतच मालतीला ‘हसी तो फसी’ हा चित्रपट दाखवण्यामागचे कारण परिणीतीने सांगितले. परिणीती म्हणाली की, तिचा सर्वात लहान मुलंही पाहू शकतील असा आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांच्या ​​’हसी तो फसी’ चित्रपटत प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एका प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित आहे २०१४ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता. या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांना आवडली.

हेही वाचा : रणबीर कपूरबरोबरच्या बिग बजेट चित्रपटाला परिणीती चोप्राने दिला नकार; म्हणाली, “असे निर्णय…”

या वर्षाच्या सुरुवातीला प्रियांका आणि निक जोनासच्या आयुष्यात मालती मेरीचे आगमन झाले. सरोगसीच्या मदतीने प्रियांका आई झाली. लग्नानंतर प्रियांका अमेरिकेत स्थायिक झाली आणि आता तीन वर्षानंतर ती भारतात येत आहे. भारतात येण्यासाठी ती खूप उत्सुक असल्याचेही तिने एक पोस्ट शेअर करत म्हटले होते. आतापार्यंत प्रियांकाने मालती मेरीचा चेहरा सगळ्यांसमोर आणला नव्हता. पण आता भारतात आल्यावर मालती मेरीची एखादी झलक चाहत्यांना पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Story img Loader