बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा नेहमी चर्चेत असते. यावर्षी स्पटेंबरमध्ये परिणीतीने आपचे नेते राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आज राघव चड्ढा यांचा ३५ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त परिणीतीने खास पोस्ट शेअर करत राघव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा- ‘टायगर वर्सेज पठाण’बद्दल सलमान खानने केलं स्पष्ट भाष्य; म्हणाला, “टायगर हा कायम…”
परिणीतीने इन्स्टाग्रामवर राघव यांच्याबरोबर काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिले की, “तू मला देवाकडून मिळालेली सर्वात गोड भेट आहेस. तुझं मन आणि बुद्धी मला आश्चर्यचकित करते. तुझी तत्त्वे, प्रामाणिकपणा आणि विश्वास मला एक चांगला माणूस बनण्याची प्रेरणा देतात. तुझी शांतता माझ्यासाठी औषधासारखी आहे. आज माझा सर्वोत्तम दिवस आहे कारण आज तुझा जन्म झाला. मला निवडल्याबद्दल धन्यवाद.”
पोस्टमध्ये परिणीतीनी राघव यांच्याबरोबरचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. लग्नानंतर राघव आणि परिणीती परदेशात फिरायला गेले होते. परिणीतीने त्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. परिणीतीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत राघव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा- अनन्या पांडेने आदित्य रॉय कपूरसोबतच्या नात्याबद्दल सोडलं मौन; त्याच्या चित्रपटाचं नाव घेत म्हणाली…
परिणीतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर परिणीतीने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मेरी प्यारी बिंदू’, ‘हंसी तो फंसी’, ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’, ‘नमस्ते लंडन’, ‘केसरी’, ‘जबरिया जोडी’, ‘इशकजादे’ चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली. काही दिवसांपूर्वीच परिणीती आणि अक्षय कुमारचा ‘मिशन रजनीगंज’ चित्रपट प्रदर्शित झाला. या मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली जादू दाखवण्यात अपयशी ठरला. आता परिणीतीचे ‘लाइफ इन अ मेट्रो’ आणि ‘चमकिला’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.