बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेले काही दिवस तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे खूप चर्चेत आहे. परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा हे एकमेकांना डेट करत आहेत असं बोललं जाऊ लागलं आहे. अनेकदा ते एकत्रही दिसतात. त्यांच्या घरचे त्यांच्या लग्नाची बोलणी करत आहेत अशाही चर्चा रंगत आहेत. अशातच परिणीतीने ती लग्न कधी करणार या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलं आहे. तर काही दिवसांपूर्वी ते दोघं एकत्र दिसल्यामुळे ते एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चा सुरू झाल्या. त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं असतानाच नुकतीच परिणीतीच्या हातात एक अंगठी दिसून आली. ही अंगठी पाहिल्यावर त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकला असं बोललं जाऊ लागलं आहे. आता अखेर परिणीतीनेच लग्न कधी करणार या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

आणखी वाचा : मालती मेरीला भेटण्यासाठी परिणीती चोप्रा उत्सुक, लाडक्या भाचीला दाखवणार ‘हा’ चित्रपट

परिणीतीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राच्या बुटीकबाहेर उभी असलेली दिसत आहे. यावेळी ती पापाराझींसमोर आली. तिने त्यांना फोटोंसाठी पोझ दिल्या. यावेळी अनेक फोटोग्राफर्सनी तिला अभिनंदन केलं. यावर तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण नंतर एका फोटोग्राफरने तिला विचारलं, “लग्न कधी करणार आहात?” त्यावर परिणीती लाजत म्हणाली, “हे राम!” त्यानंतर तो फोटोग्राफर म्हणाला आम्ही सर्वजण वाट बघतोय.” त्यावर ती म्हणाली, “धन्यवाद.”

हेही वाचा : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांची लव्ह स्टोरी नेमकी कधी सुरू झाली, जाणून घ्या

आता तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. यावर तिचे चाहते विविध प्रतिक्रिया देत असून त्यांच्या लग्नाबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत.

Story img Loader