‘पसूरी’ हे २०२२ मधील सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या गाण्यांपैकी एक होतं. पाकिस्तानी गायक अली सेठी व शाए गिलने गायलेलं गाणं हे मागच्या वर्षी प्रचंड गाजलं होतं. लग्न असो वा ट्रेंडिंग रील, सगळीकडे या जाण्याचीच चर्चा होती. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांमध्ये या गाण्याची क्रेझ होती. ‘पसूरी’ या गाण्याचं रिमेक सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘सत्यप्रेम की कथा’मधील ‘पसूरी’ गाण्याचं रिमेक पाहून नेटकरी संतापले; म्हणाले “गरुड पुराणात…”

कार्तिक आर्यन व कियारा अडवाणी यांच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात ‘पसूरी’ गाण्याचं रिमेक करण्यात आलं आहे. चित्रपटातील हे रिमेक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. मात्र, लोकांना हे नवं रिमेक गाणं पसंत पडलेलं नसल्याचं दिसून येत आहे. लोकांनी या रिमेक गाण्याला जबरदस्त ट्रोल करायला सुरुवात केली आहे. पण मूळ ‘पसूरी’ गाणं तयार कसं झालं? लेखकाला हे गाणं सूचल कसं? तुम्हाला माहिती आहे का

हेही वाचा- “भविष्यात कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारणार का?” चाहत्याच्या प्रश्नावर सोनू सूदचे स्पष्ट उत्तर; म्हणाला, “हिंदुस्थानपेक्षा…”

पाकिस्तानी गायक अली सेठी यांनी त्यांच्या एका मुलाखतीत या गाण्याच्या निर्मितीची कथा सांगितली होती. त्याने खुलासा केला होता की, एकदा तो फैसलाबादहून लाहोरला जात असताना त्याला या गाण्याची कल्पना आली. तो कारने जात होता. त्यांच्या समोरून एक ट्रक जात होता, ज्यावर लिहिले होते, ‘आग लावा तेरी मजबूरी नू.’ अलीला ही ओळ इतकी आवडली की त्याने त्यावर गाणे बनवायचे ठरवले. ट्रकच्या मागून ही ओळ उचलून त्याने ‘आन जान दी पसुरी नू’ जोडले आणि ते गाणे तयार केले. या गाण्याने अनेकांना वेड लावलं होतं. हे गाणे गेल्या वर्षी कोक स्टुडिओच्या यूट्यूबवर चॅनलवर प्रदर्शित झाले होते. आतापर्यंत ५९७ दशलक्षाहून अधिक लोकांनी हे गाणे पाहिले आहे.

हेही वाचा- २४ वर्षं झाली, तरी ‘कोहराम’चित्रपटानंतर अमिताभ बच्चन व नाना पाटेकरांनी एकत्र काम का केलं नाही? जाणून घ्या

या रिमेक गाण्याला अरिजित सिंग आणि शे गिल या दोघांनी आवाज दिला आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट यावर्षी २९ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‘सत्यनारायण की कथा’ असे होते, पण काही कारणास्तव यात बदल करुन ‘सत्यप्रेम की कथा’ असे नाव ठेवण्यात आले. कार्तिक-कियारासह या चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pasoori song idea ali sethi and shae gill revel the song making story dpj