सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत होता. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘पठाण’ला बॉयकॉट करण्याची मागणीही होत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवर आक्षेप घेण्यात आला होता. भगव्या बिकिनीत दीपिकाने रोमान्स केल्यामुळे वाद सुरू झाला होता. परंतु, या वादावर चित्रपटातील कलाकराने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी काहीच दिवस बाकी असताना मुख्य भूमिकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने ‘बेशरम रंग’वर मौन सोडलं आहे.

हेही वाचा>> अमृता फडणवीसांनी सरकारी बंगल्यात बनवला रील? राष्ट्रवादीचा आरोप; म्हणाल्या “रियाझ अलीबरोबर…”

‘पठाण’ चित्रपट निर्मित केलेल्या ‘यशराज फिल्म्स’ला शाहरुखने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला ‘पठाण’ चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख म्हणाला, “दीपिका एक उत्तम अभिनेत्री आहे. अक्शन सीन्स करताना ती मला माझ्यापेक्षा वरचढ वाटली. चित्रपटात ती एकीकडे ‘बेशरम रंग’सारखं गाणं करत आहे आणि दुसरीकडे एका मुलाला उचलून त्याला मारताना दिसत आहे. मला वाटतं, दीपिकासारखी अभिनेत्रीचं ‘बेशरम रंग’ या गाण्याला इतक्या चांगल्याप्रकारे सादर करू शकते”.

हेही वाचा>> शुबमन गिलच्या द्विशतकाशी ज्युनिअर एनटीआरचं कनेक्शन काय? ‘त्या’ पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव

हेही पाहा>> रितेश देशमुख-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या

शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख ‘पठाण’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका आहेत.