शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर रोज वेगवेगळे रेकॉर्ड मोडत आहे. लोकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतलाय. शाहरुख खानबरोबर या चित्रपटात दीपिका पदूकोणही मुख्य भूमिकेत आहे. दीपिकाच्या या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे आणि त्या गाण्यात तिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे प्रचंड वाद निर्माण झाला. ठीकठिकाणी या चित्रपटावर आणि दीपिका पदूकोणवर टीका होताना आपण पाहिली. एवढं होऊनही चित्रपटाच्या यशाने सगळ्या टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
तेव्हा या गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दीपिका पदूकोण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दीपिका पदूकोण चक्क विमानाच्या इकोनॉमी क्लास मधून प्रवास करत असतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. आरामदायी फर्स्ट क्लासने प्रवास करायचं सोडून दीपिका चक्क इकोनॉमी क्लासमध्ये दिसल्याने कित्येकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आणखी वाचा : समाजवादी पार्टीचा नेता ते CAA विरोधात आंदोलन; जाणून घ्या स्वरा भास्करचा पती फहाद अहमदबद्दल
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दीपिका एका इकोनॉमी क्लासमध्ये वॉशरूममध्ये जाताना एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केलं. खरंतर दीपिकाने स्वतःला लोकांपासून लपवायचा प्रचंड प्रयत्न केला. भगव्या रंगाची टोपी, मोठं भगव्या रंगाचं जॅकेट परिधान करूनही लोकांनी दीपिकाला बरोबर ओळखलं आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोकांनी दीपिकाला चांगलंच ट्रोल केलं आहे. “पठाणमधून पगार मिळाला नाही वाटतं” असा टोमणादेखील काही लोकांनी मारला आहे. तर काहींनी तिचं कौतुक केलं आहे, स्टार्सनीसुद्धा इकोनॉमी क्लासने प्रवास कारायला हवा असं काहींनी म्हंटलं आहे. दीपिका पदूकोण आता हृतिक रोशनबरोबर आगामी ‘फायटर’ या चित्रपटात झळकणार आहे.