बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला कायम आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पठाणने ५७ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यातही ‘पठाण’ची बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घौडदोड कायम आहे. या चित्रपटाने गुरुवारी (९ फेब्रुवारी) ५.७५ कोटींचा गल्ला जमवला आहे. देशांतर्गत या चित्रपटाने ४५२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरातही ‘पठाण’चाच डंका पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल ८७७ कोटी कमावले आहेत.
हेही वाचा>> “तशी फिगर नसल्यामुळे…”, अमृता खानविलकरने सांगितला हिंदी सिनेमात काम करण्याचा अनुभव
पठाण येत्या वीकेएण्डला जगभरात ९०० कोटींचा आकडा पार करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या या चित्रपटाने केजीएफ २ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. पठाण सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. बाहुबली २ हा चित्रपट या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा>> आदिल खानच्या अटकेनंतर राखी सावंतला मिळाली धमकी; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “माझे व्हिडीओ…”
पठाण चित्रपटातून शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण व जॉन अब्राहम या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.