‘पठाण’ हा बॉलिवूड चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण व बॉलिवूड किंग शाहरुख खान रोमान्स करताना दिसत आहे. दीपिकाने गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे वाद निर्माण झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं १२ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात आलं होतं. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या गाण्याला मात्र चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे. भगवी बिकिनी परिधान केल्यामुळे विरोध होत असलेल्या बेशरम रंग लोकप्रिय ठरत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या दहा दिवसांतच या गाण्याला युट्यूबवर १०० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर ट्विटरवरही हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला आहे.

हेही वाचा >> “तू त्याच्यापासून…”, अपूर्वा नेमळेकरच्या आईने अक्षय केळकरबद्दल केलं मोठं वक्तव्य

हेही वाचा >> ‘पठाण’च्या वादादरम्यान शाहरुख खानचा पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देतानाचा व्हिडीओ व्हायरल; प्रसिद्ध अभिनेत्री म्हणते “तुझ्या आईने…”

‘बेशरम रंग’ गाण्यातील दीपिकाचा बोल्ड अंदाज व दिलखेचक अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. या गाण्यातील तिच्या सेक्सी डान्स मुव्हचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गाण्याला विरोध व चित्रपट बॉयकॉटच्या ट्रेण्डमध्ये अडकला असतानाही ‘बेशरम रंग’ला प्रसिद्धी मिळत आहे. ‘पठाण’ चित्रपटातील दुसरं ‘झुमे जो’ हे गाणंही आज प्रदर्शित करण्यात आलं आहे.

हेही वाचा >> “शाहनवाजने लग्नात पैसे खर्च केले नाहीत म्हणून…”, ट्रोल करणाऱ्यांना देवोलिनाचं सडेतोड उत्तर

शाहरुख खान व दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख तब्बल चार वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.