शाहरुख खान हा त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या ट्रेलर नाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. प्रदर्शनानंतर काही तासातच या ट्रेलरने यू ट्यूबवर काही मिलियन व्हूज मिळवले.
एकीकडे चित्रपटाबद्दल बऱ्याच लोकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत तर दुसरीकडे नुकतंच या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी यावर भाष्य केलं आहे. तब्बल ४ वर्षांनी शाहरुख खानला घेऊन चित्रपट करणं याचं खूप दडपण असल्याचं यावेळी दिग्दर्शकाने मान्य केलं. एकूणच हा अनुभव नेमका कसा होता याबद्दल सिद्धार्थ आनंद यांनी खुलासा केला आहे.
आणखी वाचा : हॉलिवुड दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी तब्बल दोन वेळा पाहिला ‘RRR’; राजामौली ट्वीट करत म्हणाले…
यश राज फिल्म्सने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आनंद म्हणाले, “शाहरूख खानला दिग्दर्शित करणं ही एक खूप मोठी जबाबदारी होती आणि त्याने एवढा मोठा ब्रेक घेतल्यावर ती जबाबदारी आणखी वाढली. त्याने घेतलेल्या या ब्रेकमुळे चाहते आणि चित्रपटप्रेमी त्याच्या या आगामी चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. हे पाहून खूप आनंद होत आहे. आम्हाला खात्री आहे की आम्ही बनवलेला हा चित्रपट नक्कीच त्यांना आवडेल आणि त्यांना याचा अभिमान वाटेल.”
‘पठाण’ २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. या चित्रपटातून शाहरुख चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत आहे, तर जॉन अब्राहम या चित्रपटात नकारात्मक भूमिका सकारत आहे.