२५ जानेवारी या दिवशी ‘पठाण’ या बहुचर्चित चित्रपटातून किंग खान शाहरुख खानने तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर हजेरी लावली. शाहरुखच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता पठाणच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. बुधवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भगव्या बिकिनीवरून पेटलेला वाद किंवा सलमानची यात पाहायला मिळणारी झलक अशा वेगवेगळ्या कारणांसाठी हा चित्रपटात चर्चेत होता. शिवाय यातील शाहरुख आणि सलमानमधल्या त्या सीनची भरपूर चर्चा रंगत आहे. प्रेक्षकांना तर या चित्रपटाने वेड लावलंच आहे पण बॉक्स ऑफिसवर या ‘पठाण’ने इतिहास रचला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटासाठी कुठेही प्रमोशन करण्यात आलं नव्हतं.

आणखी वाचा : चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याबद्दल दिग्दर्शक अनुराग कश्यपचं वक्तव्य; म्हणाला “केवळ स्वार्थासाठी…”

केवळ २ गाणी आणि एक ट्रेलर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी थेट संवाद याच्या जोरावरच या चित्रपटाने ही मजल मारली आहे. शिवाय या चित्रपटाच्या टीमने कोणत्याही मीडिया हाऊसला मुलाखती दिल्या नव्हत्या, पण आता लवकरच शाहरुख खान मौन सोडणार आहे. उद्या शाहरुख खान, दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम तसेच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे मीडियाशी संवाद साधणार आहेत.

मीडिया रीपोर्टनुसार ‘पठाण’च्या यशाच्या निमित्ताने चित्रपटाची स्टारकास्ट प्रथमच मीडियाशी संवाद साधणार आहेत. यासाठी पत्रकार तसेच इतरही मंडळी चांगलेच उत्सुक आहेत. ‘पठाण’ने २०० कोटीचा आकडा पार केला असून याने एक दोन नव्हे तर तब्बल २० रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ४ वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या शाहरुखने बॉलिवूडला तारलं आहे.