‘पठाण’ चित्रपट आणि त्यातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू झालेला वाद दिवसागणिक आणखीनच वाढत आहे. दीपिकाने परिधान केलेली भगव्या रंगाच्या बिकिनीवरून सुरू झालेला हा वाद आता ‘बॉयकॉट पठाण’ या व्हायरल ट्रेंडपर्यंत येऊन पोहोचला आहे. सोशल मिडियावर याची जोरदार चर्चा आहे. अशातच आता या चित्रपटाच्या पुढील गाण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
लवकरच ‘पठाण’मधील शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण यांच्यावर चित्रित झालेलं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ हे या चित्रपटातील दुसरं गाणं २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गण्यातही शाहरुख आणि दीपिका यांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
पिंकव्हीलाच्या माहितीनुसार ‘पठाण’चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी सांगितले की, “झुमे जो पठाण हे गाणं या चित्रपटातील पठाण या पात्राच्या जिद्दीला सलाम करणारं गाणं असेल. गाण्यातून शाहरुख साकारत असलेल्या गुप्तहेराच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणार आहेत. या गाण्यातील शाहरुखची एनर्जि, त्याचा आत्मविश्वास प्रत्येकाला गाण्यावर थिरकायला भाग पाडेल.”
आणखी वाचा : Pathaan controversy : दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराजचं शाहरुखच्या ‘पठाण’बद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला “हे खूप…”
याबरोबरच या गाण्यात दीपिकाचासुद्धा हॉट, बोल्ड अंदाज आणि शाहरुख-दीपिकामधील केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. शिवाय विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलेलं हे नवं गाणं कव्वाली आणि मॉडर्न फ्यूजन याचं मिश्रण असणार आहे अशी चर्चा आहे. एकूणच ‘बेशरम रंग’नंतर आता ‘पठाण’चं हे आगामी ‘झुमे जो पठाण’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडतंय की यावरूनही काही वाद निर्माण होतोय ते गाणं प्रदर्शित झाल्यावरच समजेल. ‘पठाण’ २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.