‘पठाण’ चित्रपट आणि त्यातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू झालेला वाद हा काहीकेल्या थांबायचं नाव घेत नाहीये. दीपिकाने परिधान केलेली भगव्या रंगाच्या बिकिनीवरून सुरू झालेला हा वाद आता ‘बॉयकॉट पठाण’ या व्हायरल ट्रेंडपर्यंत येऊन पोहोचला आहे. अशातच या चित्रपटाच्या पुढील गाण्याची चर्चा जोर धरू लागली होती.

आता ‘पठाण’मधील शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण यांच्यावर चित्रित झालेलं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ हे या चित्रपटातील दुसरं गाणं २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या गाण्यातही शाहरुख आणि दीपिका यांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. शाहरुख खानने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या नवीन गाण्याचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं आहे. हे गाणं हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा ३ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष
chandrika new song sonu nigam sangeet manapman
सोनू निगमने मराठी गाण्याने केली नवीन वर्षाची सुरुवात, ‘संगीत मानापमान’ मध्ये गायलंय ‘चंद्रिका’ गाणं; पाहा व्हिडीओ
aishwarya narkar dances on 56 years old bollywood song kajra mohabbat wala
“कजरा मोहब्बत वाला…”, ५६ वर्षे जुन्या गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा सुंदर डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, कमेंट्सचा पाऊस
Navri Mile Hitlarla
Video : ‘नवरी मिळे हिटलरला’मधील ‘या’ जोडप्याने ‘हैला हैला’ गाण्यावर धरला ठेका; नेटकरी कौतुक करीत म्हणाले, “हृतिक आणि प्रीती…”
Tharla Tar Mag New Year Promo
ठरलं तर मग : सासरेबुवांचं मन जिंकण्याचा अर्जुनचा निर्धार! मधुभाऊंना शब्द देत म्हणाला, “तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची…”
Salman Khan
“त्याने माझ्या कानात गाणे…”, ‘मैंने प्यार किया’च्या सेटवर सलमान खानने केलेली ‘ही’ गोष्ट; भाग्यश्री म्हणाली, “तो फ्लर्ट…”

आणखी वाचा : विश्लेषण : आता ‘अवतार २’, ‘पठाण’सारखे चित्रपट ICE Theatre मध्ये पाहाता येणार! काय आहे हे तंत्रज्ञान?

या पोस्टरमध्ये शाहरुख आणि दीपिका एका बोल्ड आणि डॅशिंग अवतारात दिसत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे या नव्या गाण्यासाठी चांगलेच उत्सुक आहेत. पिंकव्हीलाच्या वृत्तानुसार ते याबद्दल म्हणाले की, ““झुमे जो पठाण हे गाणं या चित्रपटातील पठाण या पात्राच्या जिद्दीला सलाम करणारं गाणं असेल. गाण्यातून शाहरुख साकारत असलेल्या गुप्तहेराच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणार आहेत. या गाण्यातील शाहरुखची एनर्जि, त्याचा आत्मविश्वास प्रत्येकाला गाण्यावर थिरकायला भाग पाडेल.”

शिवाय या नव्या गाण्यात दीपिकाचासुद्धा हॉट, बोल्ड अंदाज आणि शाहरुख-दीपिकामधील केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. हे याच्या नव्या पोस्टरवरून स्पष्ट होतच आहे. विशाल- शेखर यांनी संगीतबद्ध केलेलं हे नवं गाणं कव्वाली आणि मॉडर्न फ्यूजन याचं मिश्रण असणार आहे अशी चर्चा आहे. ‘बेशरम रंग’नंतर आता ‘झुमे जो पठाण’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडतंय की यावरूनही काही वाद निर्माण होतोय ते गाणं प्रदर्शित झाल्यावरच समजेल. ‘पठाण’ २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader