बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. शाहरुख लवकरच तीन वर्षांच्या ब्रेकनंतर ‘पठाण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्याच्या या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा असलेली पाहायला मिळत आहे. पण हा टीझर ऑफिशियल नसून एका चाहत्याने तयार केलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘पठाण’ चित्रपटाचा टीझर नुकताच यशराज फिल्म्स नावाच्या एका फॅनपेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामुळे चाहते प्रचंड खूश आहेत. या टीझरमध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमची झलक दाखवण्यात आली आहे. शाहरुखचा चेहरा या टीझरमध्ये दाखवण्यात आलेला नाही पण त्याच्या आवाजातील संवाद प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. सोशल मीडियावर सध्या या टीझरची जोरदार चर्चा आहे.

आणखी वाचा- शाहरुख खानच्या ‘पठाण’चा सिक्वेल येणार?, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच रंगली चर्चा

शाहरुख खानचा हा चित्रपट येत्या २५ जानेवारी २०२३ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख ३ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘पठाण’ चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही मुख्य भूमिका साकारत आहेत. दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान ‘ओम शांति ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅप्पी न्यू ईयर’ या चित्रपटांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. ‘पठाण’ व्यतिरिक्त शाहरुख खान ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pathaan teaser release shahrukh khan in action watch video mrj