शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मागच्या बऱ्याच काळापासून शाहरुख खानचे चाहते आणि इतर प्रेक्षकही या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेनं वाट पाहत होते. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक सेलिब्रेटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत पण त्याचबरोबर या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्याही प्रतिक्रियांचा पाऊस पडलेला दिसत आहे. ट्विटरवर अनेकांनी ‘पठाण’चा ट्रेलर शेअर करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मागच्या बऱ्याच काळापासून वादग्रस्त कारणामुळे चर्चेत असलेल्या ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटातील गाणं ‘बेशरम रंग’मध्ये दीपिका पदुकोणने परिधान केलेली भगवी बिकिनी वादाचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटरवर सतत्याने #PathaanTrailer ट्रेंड होताना दिसत आहे. या चित्रपटात शाहरुख खान देशभक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे तर जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.

Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
Navri Mile Hitlarla
Video: “मेरी दिल की…”, एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज; प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या भावनांशी…”
Salman Khan And Digvijay Rathee
Video : ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडताच दिग्विजय सिंह राठी झाला भावुक; खंत व्यक्त करीत म्हणाला, “लोक खूप लवकर…”
shahrukh khan Abhishek bachchan dance with children video viral
आराध्या-अबरामचा मंचावर, तर विद्यार्थ्यांबरोबर शाहरुख खान अन् अभिषेक बच्चनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
pataal lok seson 2 new promo
Video : “मौसम बदलने वाला है…”; ‘पाताल लोक २’ चा प्रोमो आला प्रेक्षकांच्या भेटीला, हाथीराम चौधरीच्या मानेवरील ‘ती’ तारीख पाहून नेटकरी म्हणाले…

आणखी वाचा- Pathaan Trailer : देशभक्ती, जबरदस्त अ‍ॅक्शन अन्…; शाहरुख व दीपिकाच्या बहुचर्चित ‘पठाण’चा ट्रेलर पाहिलात का?

शाहरुख खानने ट्विटर हा ट्रेलर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिलं, “मेहमाननवाजी के लिए पठान आ रहा है औऱ पटाखे भी साथ ला रहा है” हे कॅप्शन चित्रपटातील एक संवाद आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित होणार असल्याची माहिती शाहरुखने दिली आहे.

शाहरुख खान जवळपास ४ वर्षांनंतर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ‘पठाण’ ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुखचे चाहते खुश आहेत. एका युजरने ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना लिहिलं, “फक्त शाहरुख खानच बॉलिवूडला चांगले दिवस दाखवू शकतो. संपूर्ण जगावर राज्य करणारा राजा परत आला आहे.”

आणखी वाचा-Pathaan Trailer : ‘RRR’ सारख्या अ‍ॅक्शनपटात काम केलेल्या अभिनेत्याने शाहरुखच्या ‘पठाण’चं केलं कौतुक; म्हणाला….

दुसऱ्या युजरने लिहिलं, “एक सोल्जर यह नहीं पूछता कि देश ने उसके लिए क्या किया है, पूछता है वो देश के लिए क्या कर सकता है, जय हिंद. आता परिस्थिती बदलत आहे.”

आणखी एका युजरने लिहिलं, “दाहकता आणि दुःख शाहरुखच्या चेहऱ्यावर दिसत जेव्हा तो म्हणतो- वो देश के लिए क्या कर सकता है”

याशिवाय आणखी काही युजर्सनी या ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना शाहरुख खानचं कौतुक केलं आहे. काहींच्या मते हा ट्रेलर हॉलिवूडलाही टक्कर देऊ शकतो. तर काहींनी आतापर्यंत वाट पाहावी लागली पण हा वेळ सत्करणी लागला असं म्हटलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

ट्विटरवर नेटकरी सातत्याने ‘पठाण’ ट्रेलरचं कौतुक करताना दिसत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळताना दिसत आहे. वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख करत असलेलं काम त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. शाहरुखने या चित्रपटासाठी त्याच्या शरीरयष्टीवर अधिकाधिक मेहनत घेतली आहे. तर ट्रेलर पाहिल्यानंतर दीपिकाही या चित्रपटामध्ये भाव खाऊन जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बहुचर्चित ‘पठाण’ २५ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Story img Loader