दिग्दर्शक लव रंजनच्या ‘प्यार का पंचनामा’ या सिनेमाच्या पहिल्या आणि दुसर्‍या भागाने हे दोन्ही चित्रपटा लोकप्रिय झाले. अभिनेता कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचा यांना या दोन सिनेमांमुळे बॉलीवूडमध्ये ओळखले जाऊ लागले. या चित्रपटांत सनी सिंग, दिव्येंदु शर्मा, ओमकार कपूर, इशिता राज शर्मा आणि सोनाली सैगल यांच्याही भूमिका होत्या. एका मुलाखतीत अभिनेत्री पत्रलेखाने (Patralekha) ‘प्यार का पंचनामा २’साठी दिलेल्या ऑडिशनचा अनुभव शेअर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिने सांगितले, “सिटीलाईट्सपूर्वी मी ‘प्यार का पंचनामा २’साठी ऑडिशन दिले होते. लव सर स्वतः ऑडिशन्स घेत होते. तिथे नुसरत, कार्तिक, ओमकार, सनी आणि बऱ्याच मुली होत्या. यातील तीन-चार जण फायनल झाले होते आणि त्यांना अजून दोन नवीन चेहरे हवे होते. मी ऑडिशन दिले, त्यावेळी ती भूमिका मला मिळेल असे वाटले होते.”

हेही वाचा…जान्हवी कपूर मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिन्याला बॉयफ्रेंडबरोबर करायची ब्रेकअप; म्हणाली, “एकदा माझं…”

पत्रलेखाने (Patralekha) पुढे सांगितले, “ मी जिममध्ये होते आणि लव रंजन सरांचा मला फोन आला. जेव्हा तुम्हाला दिग्दर्शकाचा फोन येतो तेव्हा तुम्हाला ती भूमिका मिळते असा सर्वसाधारण समज आहे. त्यांनी मला भेटायला बोलावलं. मी पटकन अंघोळ केली आणि मी ज्यात सुंदर दिसते असे कपडे घालून त्यांच्या ऑफिसला पोहोचले.”

पत्रलेखा पुढे म्हणाली, “त्यांनी मला बसायला सांगितलं. तिथं फक्त मी आणि ते होते. मी मनात विचार केला की आता ते आनंदाची बातमी देतील आणि लोक फुलं, चॉकलेट्स आणि केक्स घेऊन येतील. पण त्यांनी म्हटलं, ‘यार, हे जाऊ दे (हे होत नाहीये).’ त्या क्षणी मला खूप वाईट वाटलं आणि विचार आला, असं कसं त्यांनी मला बोलावून माझ्या तोंडावर नकार दिला? हे योग्य नाही.”

हेही वाचा…पहिल्या सिनेमानंतर ‘या’ अभिनेत्रीकडे नव्हतं दोन वर्षं काम, वडापाववर काढले दिवस; लोकल ट्रेनने केला प्रवास, खुलासा करत म्हणाली…

पत्रलेखाला(Patralekha) या नकाराचा राग आला असला तरी नंतर तिने या घटनेचा विचार केल्यावर दिग्दर्शकाने तिला दिलेली वागणूक पटली. ती म्हणाली, “मी बाहेर आले आणि खूप अस्वस्थ झाले. घरी परतल्यावर त्यांनी मला एक अभिनेत्री आणि कलाकार म्हणून किती आदर दिला याची जाणीव झाली. त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि म्हणाले, ‘बेटा, नाही जमलं, पण आपण पुढे जाऊन काम करूया.’ हे खूप मोठं आहे आणि मला वाटतं त्यामुळेच मला त्यांची निर्मिती असलेला ‘वाइल्ड वाइल्ड पंजाब’ सिनेमा मिळाला.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patralekha reveals her pyaar ka punchnama 2 audition rejection experience psg