Mamta Kulkarni expelled from Kinnar Akhara : अभिनेत्री ममता कुलकर्णीने प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला. ममताने पिंडदान केले आणि तिची किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वरपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र तिच्या नियुक्तीला रामदेव बाबासह किन्नर आखाड्यातूनही विरोध होत होता. आता एका आठवड्याने ममता कुलकर्णीकडून महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आले. इतकेच नाही तर तिची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली. या प्रकरणी एका अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

‘लव्ह यू जिंदगी’, ‘डायन’, ‘ससुराल सिमर का’, ‘नागिन’ व ‘बिग बॉस’ यासह अनेक शोमध्ये काम करणारी अभिनेत्री पवित्रा पुनिया हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. पवित्राची ही पोस्ट ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी झाली, त्याबद्दल आहे. पवित्राने फक्त एकाच शब्दात ममतावर झालेल्या कारवाईबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

पवित्रा धार्मिक व्यक्ती आहे, तिच्या देवदर्शनाचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. पवित्राने ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी झाल्याची एक पोस्ट रिपोस्ट करत ‘परफेक्ट’ असं लिहिलं आहे. ममताकडून महामंडलेश्वर पद काढून घेणं आणि तिला किन्नर आखाड्यातून काढणं हे योग्य असल्याचं मत पवित्राने व्यक्त केलं आहे.

पाहा पोस्ट

Pavitra Puniya on Mamta Kulkarni being expelled from Kinnar Akhara
पवित्रा पुनियाची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

दरम्यान, किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला आखाड्यातून काढलं. देशद्रोहाचा आरोप असलेल्या ममता कुलकर्णीला आखाड्यात घेतल्याबद्दल आणि त्यांच्या नकळत तिची महामंडलेश्वरपदी नियुक्ती केल्याबद्दल महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी केली आहे.

२५ वर्षांपूर्वी सिनेसृष्टी सोडणारी ममता कुलकर्णी दुबईत राहत होती. ती १२ वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यासाठी भारतात आली होती. त्यानंतर आता एका महिन्यापूर्वी ती भारतात आली. कुंभमेळ्यात सहभागी झाल्यावर तिने संन्यास घेत असल्याची घोषणा केली. महाकुंभात संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णीला ‘श्री यमाई ममता नंद गिरी’ असे नवीन आध्यात्मिक नाव देण्यात आले होते. तसेच किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद तिला देण्यात आले होते. पण वादामुळे एका आठवड्यातच तिचं पद काढून घेण्यात आलं आहे.

Story img Loader