भारतातील सीबीएफसी बोर्डावर भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यापासून निर्माते व सीबीएफसीचे माजी अध्यक्ष पेहलाज नीहलानी हे पुन्हा चर्चेत आले. मध्यंतरी जेव्हा ते सीबीएफसी प्रमुख होते तेव्हा त्यांनी चित्रपटांच्या प्रदर्शनात अडथळे आणल्याचे आरोप त्यांच्यावर बऱ्याच दिग्दर्शक तसेच कलाकारांनी लावले होते. आता पुन्हा एकदा पेहलाज निहलानी चर्चेत आले आहेत.
नुकतंच त्यांनी एका मुलाखतीदरम्यान दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीबद्दल वक्तव्य केलं आहे. दिव्या भारतीने त्यावेळी चित्रपटात काम करण्यासाठी बरेच नखरे केले असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. डेव्हिड धवन यांच्या ‘आंखे’ चित्रपटाचे निर्माते पेहलाज निहलानी होते. त्यावेळी या चित्रपटात दिव्या भारती प्रमुख भूमिकेत दिसणार होती.
आणखी वाचा : हस्तमैथुनसारख्या विषयामुळे सेन्सॉरच्या कात्रीत सापडलेला ‘OMG 2’ आता ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?
याविषयी बॉलिवूड ठिकानाशी संवाद साधताना पेहलाज म्हणाले, “हो या चित्रपटात दिव्या भारती, पूजा भट्ट आणि जुही चावला या तिघीही काम करणार होत्या. त्यावेळी दिव्या भारतीबरोबर चंकी पांडेला घ्यायचं ठरवलं अन् रितू शिवपुरी ही गोविंदाची हिरोईन म्हणून दिसणार होती. जेव्हा डेव्हिड यांनी दिव्याला याबाबतीत माहिती दिली तेव्हा तिने चंकीबरोबर काम करण्यास नकार दिला, तिने यावरून बराच वादही घातला अन् अखेर तो चित्रपट सोडून दिला.”
अवघ्या १९ व्या वर्षी हे जग सोडून जाणाऱ्या दिव्या भारतीला आजही बॉलिवूड विसरू शकलेलं नाही. तिचा मृत्यू हा आजही एक न उलगडलेलं गूढच आहे. दिव्या भारतीने लहानशा करकीर्दीतीतही चांगलेच सुपरहीट चित्रपट दिले. दिव्या ही ८० आणि ९० च्या दशकातील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री होती.