अभिनेत्री किंवा अभिनेत्यांसारखे हुबेहूब दिसणाऱ्या अनेक व्यक्ती आपण पाहिल्याच असतील. या व्यक्तींचे चालणे, बोलणे, वागणे खऱ्या कलाकारांसारखेच असते. अनेकदा यांना पाहून आपण गोंधळात पडतो. बॉलीवूडचा किंग शाहरुख खानसारखे दिसणारेही अनेक लोक आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर अशा व्यक्तींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला बघितल्यावर तुम्हाला खरोखरच तो शाहरुख खान वाटेल. सूरज कुमार असे त्या व्यक्तीचे नाव आहे. सूरज हुबेहूब ९० च्या दशकातील शाहरुख खानसारखा दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- लैंगिक समानतेविषयी बोलणं आलिया भट्टला पडलं महागात; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “तुझ्या बोलण्याला…”

सूरज कुमार इन्स्टावर खूप प्रसिद्ध आहे. छोटा शाहरुख असे त्याचे नाव असून तो दररोज त्याचे व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतो. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सूरज हुबेहूब ९० च्या दशकातील शाहरुखसारखा दिसत आहे. शाहरुखसारख्या दिसणाऱ्या सूरजला पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सूरजचा लूक ९० च्या दशकातील शाहरुख खानसारखा दिसतो. अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत ‘९० च्या दशकातील शाहरुख खान’ असे लिहिले आहे. दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जेव्हा शाहरुख खान चित्रपटात आला होता तेव्हा हुबेहूब असाच दिसत होता.” आणखी एकाने लिहिले, “मला वाटले हा शाहरुखचा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर मला कळले की हा शाहरुखसारखा दिसणारा आहे.” तर काही जणांनी सूरजला चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला आहे.