अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनॉन गेले अनेक दिवस त्यांच्या ‘भेडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील त्या दोघांचे लूक्स समोर आले होते. तसेच या चित्रपटाच्या टीझरलाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. परंतु ‘भेडिया’चा ट्रेलर पाहून नेटकरी पुन्हा एकदा ‘आदिपुरुष’वर टीका करू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शनावर निर्मातेही फिदा; ओम राऊतला भेट म्हणून दिली महागडी गाडी

प्रभासचा आगामी ‘आदिपुरुष’ हा चित्रपट त्याच्या घोषणेपासूनच खूप चर्चेत आला. या चित्रपटाची पोस्टर्स पाहून प्रेक्षकांच्या मनातील या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. बहुतांश प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया देत टीका केल्या. तसेच अनेकांनी या चित्रपटाची तुलना इतर चित्रपटांशी केली. तसाच काहीसा प्रकार ‘भेडिया’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावरही पाहायला मिळाला आहे.

‘भेडिया’चा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या ट्रेलरवर नेटकरी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. तो पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, “जंगल-जंगल बात चली है.” दुसऱ्याने लिहिले. ‘अप्रतिम ट्रेलर आणि अप्रतिम VFX.’ तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “अखेर प्रतीक्षा संपली…ट्रेलर अप्रतिम आहे.” तर अनेकांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाची तुलना ‘भेडिया’शी करत ‘भेडिया’ चित्रपटाचे व्हीएफएक्स हे ‘आदिपुरुष’पेक्षा चांगले असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : “आजही मला रिक्षातून जाताना…”, ‘दिल्ली क्राईम’ फेम शेफाली शाहचे मोठे विधान

‘भेडिया’ हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात वरुण धवन, क्रिती सेनॉन यांच्यासह दीपक डोबरियाल आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पुढच्या वर्षी १२ जानेवारीला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभासच्या प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत तर क्रिती सेनॉन ही जानकीच्या आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठमोळा देवदत्त नागे देखील या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण पात्र साकारले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People trolled adipurush after watching bhediya trailer rnv