बॉलिवूड अभिनेता व सलमान खानचा भाऊ अरबाज खानने २४ डिसेंबर २०२३ रोजी दुसरं लग्न केलं. त्याने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी बहीण अर्पिता खानच्या घरी निकाह केला. त्याच्या लग्नाला सलमान खान, सोहेल खान, वडील सलीम खान, आई सलमा व हेलन यांच्यासह त्याचा मुलगा अरहानदेखील उपस्थित होता. अरबाजच्या या लग्नाची सोशल मीडियावर आणि इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा झाली.

बऱ्याच लोकांनी अरबाजच्या लग्नावर टीका केली तर काहींनी त्याचं कौतुकही केलं. अरबाजच्या घरच्यांनीही त्याच्या या निर्णयात त्याला पाठिंबा दिला. नुकतंच या जोडप्याने त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या फोटोमध्ये अरबाज आणि शुरा हे एकमेकांच्या खूप जवळ आहेत अन् या क्लोज अप शॉटमध्ये ते एकमेकांकडे अत्यंत प्रेमाने बघत आहेत.

Kiran Mane
किरण मानेंनी शेअर केला प्रिया बेर्डेंचा जुना व्हिडीओ; म्हणाले, “एका सुपरस्टारच्या पत्नीने…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Beating of girlfriend by boyfriend on road
“त्याने आधी तिच्या कानाखाली मारली नंतर केस ओढले…” भररस्त्यात प्रियकराकडून प्रेयसीला मारहाण; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “त्याची मर्दांगी…”
Purva Kaushik
‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने ऑनस्क्रीन बहिणीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाली…
Image Of Rajeev Shukla
“काँग्रेस असो वा भाजपा, हा व्यक्ती…” कोल्ड प्लेच्या गायकाबरोबर राजीव शुक्लांचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर मीम्सचा पूर

आणखी वाचा : गाजलेल्या शाहबानो खटल्यावर लवकरच येणार चित्रपट; ‘द फॅमिली मॅन’ सीरिजच्या लेखकाकडून मोठी घोषणा

सोशल मीडियावर या क्युट कपलच्या फोटोची जबरदस्त चर्चा आहे. बरीच लोक या फोटोवर कॉमेंट करत हे दोघे एकमेकांच्या किती प्रेमात आहेत याचे दाखले देत आहेत. तर दुसरीकडे काहींनी अरबाजला यावरुण ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युझरने कॉमेंटमध्ये लिहिलं की, “तुम्ही वडील आणि मुलीची जोडी वाटत आहात.” तर दुसऱ्या युझरने लिहिलं की, “सलमान घरात कोपऱ्यात बसून रडत असेल.” तर आणखी एक युझर म्हणतो, “ह्याला म्हातारचळ लागलं आहे.”

सोशल मीडियावर अरबाज आणि शुराचा रोमॅंटिक अंदाज चांगलाच चर्चेत आहे. अरबाज खानने त्याच्यापेक्षा २५ वर्षांनी लहान असलेल्या शुरा खानशी दुसरं लग्न केलं. अरबाजचं पहिलं लग्न मलायका अरोराशी झालं होतं. १९ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी सहा वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला आणि त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे. घटस्फोटानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज हा त्याच्या दुसऱ्या लग्नानंतर संसारात रमल्याचं या फोटोवरुन स्पष्ट होत आहे.

Story img Loader