कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्या आगामी ‘भूत पोलिस’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हे तीनही कलाकार हे सध्या याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यातील गाणी, ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी म्हणून सादर केला जात आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी याची टीम खूप मेहनत घेत आहे. नुकतंच कतरिनाने यासाठी सलमानच्या ‘बिग बॉस’मध्ये हजेरी लावली होती.

आता ही तिघे कलाकार आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईच्या आयआयटी मध्ये पोहोचले आहेत.या भेटीदरम्यान कलाकारांनी आयआयटीमधील विद्यार्थ्यांबरोबर डान्स करत धमाल केली. इतकंच नाही त या तिन्ही स्टार्सनी त्या मुलांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातील वेगवेगळ्या स्टार्टअप्सवर चर्चादेखील केली.

आणखी वाचा : अश्रद्धतेकडून सश्रद्धतेचा प्रवास; बहुचर्चित ‘गोदावरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

स्टेजवर चित्रपटातील जगातील सर्वात सुंदर भूत कतरिना कैफ आणि दोन ‘घोस्टबस्टर्स’ इशान आणि सिद्धांत यांना पाहून विद्यार्थ्यांना खरोखरच आनंद झाला. कलाकारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तसेच त्यांनी चित्रपटातील ‘काली तेरी गट्ट’ गाण्यावर डान्सही केला. याशिवाय, कलाकारांनी भुतांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित करणार्‍या चित्रपटात स्टार्टअप कसे चालवतात हेदेखील सांगितले. तसेच, उपस्थित दर्शकांनी जेव्हा ‘हाउ इज द जोश’चे नारे लावले तेव्हा को-स्टार्स कतरिनाला विकी कौशलच्या नावाने चिडवताना दिसले.

गुरमीत सिंगद्वारे दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, ‘फोनभूत’ एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे निर्मित आहे, ज्याचे प्रमुख रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर असून, हा चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी, आणि ईशान खट्टर यांची पडद्यावरील केमिस्ट्री पाहण्यासाठी दर्शक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader