मुंबईत सध्या पावसाची संततधार आहे. याच पावसात अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) फिरायला बाहेर पडला, पण त्याच्याबरोबर पत्नी ऐश्वर्या राय बच्चन व मुलगी आराध्या नव्हते तर तो भाचा अगस्त्य नंदाबरोबर बाहेर पडला होता. अभिषेक व अगस्त्यबरोबर किंग खानची लाडकी लेक सुहानादेखील होती. बऱ्याच काळापासून सुहाना व अगस्त्य एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे, अशातच आता त्यांचा हा फोटो चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी रात्री अभिषेक बच्चन त्याच्या नवीन काळ्या कारमध्ये पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी त्याच्याबरोबर बहीण श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदा, मुलगी नव्या नवेली नंदा आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही होते. अगस्त्य आणि सुहाना डेट करत असल्याच्या अफवा आहेत. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. योगेन शाह नावाच्या अकाउंटवरून फोटो शेअर करण्यात आले आहेत.

अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिषेक बच्चन एका मोठ्या काळ्या कारमध्ये ड्रायव्हर सीटवर बसलेला दिसतो. तर त्याच्या शेजारच्या सीटवर त्याचा भाचा अगस्त्य नंदा बसला आहे. त्यांच्या मागे नव्या नवेली नंदा आणि सुहाना खान दिसत आहेत. मुंबईच्या पावसात भिजत सर्वजण गाडीत बसले आणि याच वेळी पापाराझींनी त्यांचे फोटो काढले.

फोटो – योगेन शाह इन्स्टाग्राम

अभिषेक बच्चनच्या कारचे ऐश्वर्या रायशी कनेक्शन

या सर्व जणांच्या फोटोबरोबरच अभिषेकच्या नवीन कारच्या नंबरप्लेटची चर्चा आहे. अभिषेकच्या कारवरील ५०५० हा नंबर आधी त्याच्या मर्सिडीज-बेंझ एस-क्लासवर दिसला होता. रिपोर्ट्सनुसार ही कार त्याने विकली आहे. मात्र, ज्या नवीन कारमध्ये अभिषेक या सर्व मुलांबरोबर दिसला त्याचा नंबरही ५०५० आहे. एका पापाराझीने एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये हा ऐश्वर्याचा आवडता नंबर असल्याचं म्हटलं आहे. तसेच हा नंबर विकलेल्या मर्सिडीजसारखाच आहे. ऐश्वर्या रायने आराध्या बच्चनला जन्म दिला तेव्हा तिला ५०५० नंबर प्लेट असलेल्या कारमधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं, असंही म्हटलं जातं.

“माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना

फोटो – योगेन शाह इन्स्टाग्राम

अगस्त्य- सुहानाच्या अफेअरच्या चर्चा

अगस्त्य नंदा व सुहाना खान एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या शूटिंगपासून होत आहेत. सुहाना व अगस्त्य अनेकदा एकमेकांबरोबर दिसतात. इतकेच नाही तर ते पार्टीलाही एकत्र जातात.

सुहाना खान व अगस्त्य नंदा

काही महिन्यांपूर्वी एका पार्टीतून दोघे बाहेर पडताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते, त्यावेळी अगस्त्य सुहानाची काळजी घेताना व तिला कारपर्यंत सोडताना दिसला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photos of abhishek bachchan car ride with suhana khan agastya nanda navya naveli nanda hrc