प्रसिद्ध नाटककार व अभिनेते पीयूष मिश्रा त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वासाठी ओखळले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. याबरोबरच ते गीतकार व संगीतकारही आहेत, तसेच ते कविता व शायरीही लिहितात. शिवाय पीयूष यांचे लाईव्ह शोजसुद्धा चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. अभिनयाबरोबरच पीयूष हे त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकतंच त्यांनी ‘साहित्य आजतक २०२३’च्या मंचावर हजेरी लावली अन् स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले.

पीयूष यांना सर्वप्रथम सलमानच्या ‘मैने प्यार कीया’ या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. परंतु त्यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला अन् हा चित्रपट सलमान खानकडे आला. यानंतर मनोरंजनविश्वात पीयूष यांना स्वतःची ओळख निर्माण करायला एक दशक वाट पहावी लागली. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पीयूष यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. आपल्या पत्नीसमोर त्यांनी जेव्हा त्यांची गुपितं उलगडली तेव्हा नेमकी त्यांची मनस्थिति कशी होती याविषयी भाष्य केलं आहे.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…

आणखी वाचा : “जेव्हा पुरुष गरोदर…” स्त्री-पुरुष समानतेबद्दल अन् ‘फेमीनिजम’बद्दल नीना गुप्तांनी केलं परखड भाष्य

पीयूष यांच्या लग्नानंतरही बऱ्याच गर्लफ्रेंड्स होत्या अन् त्यावेळी त्यांची जीवनशैलीही फारशी चांगली नव्हती. याबरोबरच घर चालवण्यातही पीयूष यांचा काहीच सहभाग नसायचा. त्यावेळी त्यांना कुणीतरी असा सल्ला दिला की आपल्या पत्नीसमोर त्यांनी सगळ्या गोष्टी कबूल करायला पाहिजेत अन् सगळं खरं सांगायला पाहिजे.एकेदिवशी पीयूष यांनी आपल्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली द्यायचा निर्णय घेतला अन् एका संध्याकाळी पीयूष यांनी त्यांच्या पत्नीसमोर घडाघडा आपलं मन मोकळं केलं.

आपल्या जीवनात त्यांनी केलेल्या चुका त्यांनी कबूल केल्या, इतकंच नव्हे तर लग्नानंतरही कोणत्या कोणत्या स्त्रीबरोबर त्यांचे संबंध होते हेदेखील पीयूष यांनी आपल्या पत्नीसमोर कबूल केलं. याबद्दल पीयूष म्हणाले, “त्या रात्री मला वाटलं की आज माझा घटस्फोट नक्की होणार, माझी पत्नी म्हणाली की मी केलेल्या या चुका ऐकून तिला फार वाईट वाटलं आहे, परंतु मी हे सगळं अत्यंत प्रामाणिकपणे कबूल केल्याने ती खुश होती अन् तिने आलिंगन देत माझ्या या कृतीचं स्वागत केलं.” आयुष्यात कोणतीही चूक केली तर त्याची कबुली तातडीने द्यायला हवी ज्याने तुमचं मन हलकं होतं हा संदेश पीयूष यांनी त्यांच्या या मुलाखतीमध्ये तरूणांना दिला आहे.

Story img Loader