हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर मनोरंजनविश्वात शोककळा पसरली. त्यांच्या अंत्ययात्रेलादेखील बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. अशातच सतीश कौशिक यांच्या मॅनेजरने एका मोठा खुलासा केला आहे.
८ मार्चला कुटुंबीयांसह होळी साजरी करण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. दिल्लीतील एका मित्राच्या फार्महाऊसवर होळीनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत ते सहभागी झाले होते. सतीश कौशिक यांचे मॅनेजर संतोष राय यांनी इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की “रात्री ८. ३० वाजता जेवण झाल्यानंतर ते झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. सकाळी ८.५० च्या विमानाने ते मुंबईला येणार होते. रात्री १२ वाजता ते माझं नाव घेत ओरडत होते. मी लगेचच तिथे गेलो त्यांना विचारले का ओरडत आहात? मला कॉल का नाही केलात?” त्यावर ते म्हणाले “मला श्वास घ्यायला त्रास होत आहे. मला लगेच डॉक्टरांकडे घेऊन चल.” आम्ही लगेचच गाडीत बसून निघालो.
संतोष यांनी सतीश कौशिकांच्या शेवटच्या शब्दाबद्दल बोलताना ते असं म्हणाले, “संतोष मला वाचव, मला मरायचं नाही. माझी मुलीसाठी (वंशिका0 मला जगायचं आहे. पण मला नाही वाटत मी जगेन. शशी, वंशिकाची काळजी घे. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहचेपर्यंत हे बेशुद्ध झाले होते.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
“त्याने अनेक चित्रपटात…” दिवंगत अभिनेते सतीश कौशिकांबद्दल गोविंदाचा मोठा खुलासा
सतीश कौशिक यांच्या मृत्यूला मात्र आता एक वेगळे वळण लागले आहे. दिल्ली पोलीस सतीश कौशिक यांच्या निधनानंतर तपास करत आहे. चौकशीसाठी ते सतीश कौशिक यांनी ज्या फार्महाऊसमध्ये होळी पार्टीला हजेरी लावली होती, तिथे पोहोचले. ‘एएनआय’च्या वृत्तानुसार, तपास पथकाने फार्महाऊसमधून काही संशयास्पद औषधं जप्त केली आहेत. आता लवकरच या प्रकरणावर पोलीस खुलासा करतील.