बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. एखादा उत्सव असल्यासारखं वातावरण तयार झालं आहे. ७ जुलैला प्रदर्शित होताच ‘जवान’ चित्रपटाने बरेच रेकॉर्ड मोडले आहेत. दोन दिवसांत शाहरुखच्या या चित्रपटाने भारतात जवळपास १२८ कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. अशा या सुपरहिट चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक झळकली आहे. पण याचदरम्यान गिरीजाच एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. “प्लीज मराठी चित्रपटात घ्या, मी उत्तम मराठी बोलते,” असं तिनं वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Dream Girl 2: ‘जवान’च्या धमाक्यामुळे ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपट निर्मात्यांची वाढली चिंता, घेतला महत्त्वाचा निर्णय

‘सकाळ’ या वृत्तसंस्थेशी ‘जवान’ चित्रपटानिमित्ताने गिरीजाने संवाद साधला. यावेळी तिला विचारलं की, ‘तू ओटीटीसाठी काम करत असते. तसेच हिंदी चित्रपटातही काम करत असते. मराठीमध्ये तू क्वचित पाहायला मिळतेस. आता ‘पैठणीची गोष्ट’ या चित्रपटात तू झळकली. पण भूमिका कशा पद्धतीने निवडतेस?’

हेही वाचा –“मराठी लोकांमध्ये एकी पाहिजे”; अभिनेते संदीप कुलकर्णी असं का म्हणाले?

यावर गिरीजा म्हणाली की, “खरंतर आधीपासून विचार करून किंवा एखादा ग्राफ ठरवून असं काही होत नसतं. जे काम मला उत्कटतेने करावेसे वाटते ते काम मी निवडते. आणि खरंतर मला मराठीत जास्त कोणी विचारलं नाहीये. खूप चित्रपटाची ऑफर आलीये आणि मी नाही म्हटलंय, असं काहीच झालं नाहीये. जर ही मुलाखत मराठी निर्माते बघत असतील तर, प्लीज मराठी चित्रपटात घ्या, मी उत्तम मराठी बोलते आणि मराठीच आहे.”

हेही वाचा – “लता दीदी आणि आशाताई यातलं कोण ग्रेट?” विजू मानेंनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

गिरीजाच्या या वक्तव्यानंतर तिला विचारलं की, “खरंच असं होतंय का तुला मराठीत काम करायचं आहे आणि होत नाहीये?” यावर अभिनेत्री म्हणाली की, “खरंतर मी वाटत बघत बसली आहे, कोणी विचारत नाहीये, असं नाही. मी काम करतेय. माझं खूप काही सुरू आहे. मात्र मला खूप लोक विचारतात, तुम्ही मराठीत का दिसत नाही? पण मी काही ठरवलं नाहीये की, आपण मराठीत दिसायच नाही. माझ्याकडे काही येतच नाहीये. कदाचित माझ्यासाठी योग्य असं काही सापडलं नसेल. मराठीत काम करणारी सगळीच माणसं माझ्या ओळखीची आहेत. सगळेच मित्र आहेत, सगळ्याच मैत्रिणी आहेत. त्यामुळे असं काही नसेल ना की, हिला नको विचारायला. कदाचित माझ्यासाठी अजून हवी तशी भूमिका नसेल. म्हणून मराठीत विचारणा झाली नसेल. आणि जेव्हा होईल तेव्हा खूपच आवडेल. माझी ही भाषा आहे, त्याच्यावर माझी पकड आहे. आपण ज्या भाषेत विचार करतो, त्या भाषेत अभिनय करणं, खूप वेगळं आणि घरी असल्यासारखं वाटत. त्यामुळे मराठी नाटक, चित्रपट करायला खूप आवडेल. अर्थात मी सगळ्या गोष्टीची वाटत बघतेय. त्यात मी मराठी चित्रपटाचीही वाट बघतेय.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Please take it in a marathi movie says girija oak who worked with shahrukh khan in the movie jawan pps
Show comments