बॉलीवूडचे शोमॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांची १४ डिसेंबरला १००वी जयंती आहे. यानिमित्ताने कपूर कुटुंबियांनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. या शताब्दी कार्यक्रमात दिग्गज कलाकार मंडळींसह नेते उपस्थित राहणार आहेत. याच निमित्ताने कपूर कुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यासाठी दिल्लीत गेलं होतं. नीतू कपूर, रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, आलिया भट्ट, आदर जैन, अनीसा मल्होत्रा या कपूर कुटुंबातील सदस्यांनी दिल्लीतील पंतप्रधानच्या निवासस्थानी जाऊन मोदींची भेट घेतली आणि त्यांना आमंत्रण दिलं. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसंच कपूर कुटुंबातील सदस्यांनी देखील फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री करीना कपूरने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे फोटो करीनाने शेअर केले आहेत. करीनाने हे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “आमचे दिग्गज आजोबा राज कपूर यांचा विलक्षण जीवनप्रवास चित्रपटांच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. या खास गोष्टीचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यासाठी मोदींची मी आभारी आहे.”
हेही वाचा – Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
पुढे करीना कपूरने लिहिलं की, आजोबांच्या कलात्मकतेची, दूरदृष्टीची आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाची १०० गौरवशाली वर्षे साजरी करत असताना, आम्ही त्यांच्या वारशाच्या शाश्वत प्रभावाचा सन्मान करतो, जो आम्हाला आणि येणाऱ्या पिढ्यांना सतत प्रेरणा देत आहे. त्यांचे प्रतिष्ठित चित्रपट प्रदर्शित करण्यात आणि ‘राज कपूर १०० फिल्म फेस्टिव्हल’द्वारे भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी केलेल्या कामाची आठवण करून देण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. १३ ते १५ डिसेंबरपर्यंत फिल्म फेस्टिव्हल असणार आहे. १० चित्रपट, ४० शहरात आणि १३५ चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत एक खास गोष्ट पाहायला मिळाली. ते म्हणजे मोदी यांनी करीना-सैफची मुलं तैमूर आणि जेहसाठी एक खास भेट दिली. नरेंद्र मोदींनी एका कागदावर टीम ( तैमूर ) आणि जेहचं नाव लिहित स्वतःची सही केली. याचा फोटो करीनाने तिच्या इन्स्टाग्राम आणि स्टोरीला देखील शेअर केला आहे.
हेही वाचा – एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे फोटो करीनासह करिश्मा कपूर, रिधिमा कपूर यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या कपूर कुटुंब खूप चर्चेत आहेत.