सध्या संपूर्ण देशातच ‘डीपफेक व्हिडिओ’ची प्रकरणं वेगाने वाढत आहेत. दरम्यान, पोलीस आणि प्रशासनही सक्रिय झाले असून अशा प्रकरणांचा कडक तपास केला जात आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ रिलीज झाल्यापासून त्याची बरीच चर्चा होत आहे. रश्मिका पाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री काजोलचाही एक व्हिडीओ समोर आला. आता या ‘डीपफेक व्हिडीओ’ प्रकरणासंदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे.

दिल्ली पोलिसांनी गुरुवारी स्पष्ट केले की, त्यांना रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओशी संबंधित प्रकरणाच्या तपासात आवश्यक पुरावे सापडले असून काही तांत्रिक विश्लेषणाद्वारे याची पुष्टी केली जात आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “या तंत्रज्ञानातील तज्ञ सर्व आयपी अॅड्रेसची माहिती काढत आहेत जिथून हा व्हिडिओ प्रथम इंटरनेटवर अपलोड करण्यात आला होता.”

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आणखी वाचा : “हा चित्रपट सुपरहीट होऊच शकत नाही…” जेव्हा रणबीर कपूरने केलेलं ‘कबीर सिंग’बद्दल मोठं वक्तव्य

पोलिस उपायुक्त (IFSO, स्पेशल सेल) हेमंत तिवारी म्हणाले की त्यांच्याकडे आवश्यक ते पुरावे मिळाले आहेत आणि आरोपींना लवकरच अटक केली जाईल. दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवल्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी, दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) ने या प्रकरणाच्या संबंधात अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.

त्यापूर्वी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर या मुद्द्यावर पोस्ट केली होती. डीपफेक व्हिडीओमुळे लोकशाहीसाठी नवीन धोका निर्माण होऊ शकतो असे त्यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले होते. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की “सरकार लवकरच डीपफेकशी निगडीत नवीन नियम आणणार आहे.” सध्या या आशा व्हिडीओजची आणि फोटोजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. सारा तेंडुलकर, शुबमन गील, क्रीती सेनॉनसारखे कित्येक सेलिब्रिटीज या प्रकाराला बळी ठरले आहेत.