Police Reaction on Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा (Anil Arora Suicide) यांनी आत्महत्या केली आहे. मुंबईतील वांद्रे भागात ज्या इमारतीत ते राहायचे त्याच इमारतीतून उडी घेत त्यांनी जीवन संपवलं. ही घटना घडली तेव्हा मलायका अरोरा मुंबईत नव्हती, ती आता घरी परतली आहे. त्यांच्या घरी मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती व इतरही बरेच जण पोहोचत आहेत, अशातच या प्रकरणावर मुंबई पोलिसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माध्यमांशी बोलताना झोन ९​ चे डीसीपी राज तिलक रोशन पोलीस अधिकारी म्हणाले, “अनिल अरोरा ६२ वर्षांचे होते. त्यांचा मृतदेह सापडला आहे. ते सहाव्या मजल्यावर राहायचे. आमची टीम इथे पोहोचली असून आम्ही पुढील तपास करत आहोत.” सुसाईड नोट सापडली आहे का? असं विचारल्यावर “आम्ही आता सखोल तपास करत आहोत, सर्वच अँगल्सनी तपास करत आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली. वरिंदर चावला या पापाराझी अकाउंटवरून पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Video: वडिलांच्या आत्महत्येबद्दल कळताच घरी परतली मलायका अरोरा; अर्जुन कपूर अन् अरबाज खानचे कुटुंबीयही पोहोचले

अनिल अरोरा यांच्या कुटुंबियाकडून काही वैद्यकीय अडचणी होत्या का, याबाबत काही माहिती कळाली का? असं विचारल्यावर ते म्हणाले, “फॉरेन्सिक टीम इथे पोहोचली आहे. फॉरेन्सिक तपास चालू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत आहे. बाकी माहिती तपासानंतरच कळेल.”

Video: मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, अरबाज खान पोहोचला घटनास्थळी, व्हिडीओ आला समोर

पोलीस काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

दरम्यान, अनिल अरोरा यांनी आज सकाळी ९ वाजता आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येबद्दल कळाल्यानंतर अरबाज खान तिथे पोहोचला होता. ही घटना घडली तेव्हा मलायका अरोरा मुंबईत नव्हती. ती पुण्यात होती. काही वेळाआधीच ती घरी पोहोचली. अरबाज खानचे आई-वडील, अर्जुन कपूर, सोहेल खान, मलायकाची बहीण अमृता अरोरा हे सर्वजण वांद्रे येथील घरी पोहोचले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police reaction on malaika arora father anil arora death hrc