Saif Ali Khan Attacked News : अभिनेता सैफ अली खान व करीना कपूर यांच्या मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील घरी दरोड्याचा प्रयत्न झाला. चोरटा आधी मदतनीसच्या खोलीत शिरला, तिचा आरडाओरडा ऐकून सैफ तिथे पोहोचला. चोरट्याने सैफवर चाकूने हल्ला केला. त्याला हात व मणक्याला जखमा झाल्या आहेत. सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या तपासात असं दिसतंय की हल्लेखोराने चोरीच्या उद्देशाने इमारतीच्या फायर एस्केप पायऱ्यांचा वापर करून सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता. ही घटना मध्यरात्री अडीच वाजता घडली. चोरट्याला पाहून घरातील मदतनीसने आरडाओरडा करत मदतीसाठी अलार्म वाजवला. यानंतर सैफ अली खान खोलीत गेला, तिथे त्याची चोरट्याबरोबर झटापट झाली, यादरम्यान त्याने सैफवर सहा वेळा चाकूने वार केले. तसेच घरातील मदतनीसही जखमी झाली आहे, तिच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर घुसखोर घटनास्थळावरून पळून गेला आणि त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी १० पथके तयार केली आहेत.

ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
What Raza Murad Said?
Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर चाकू हल्ला, रझा मुराद यांनी व्यक्त केला वेगळाच संशय; “हत्येच्या उद्देशाने….”
Saif Ali Khan attacked by intruder at bandra home
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना
Police Suspects Saif Ali Khan House Helper knew Attacker
हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस, पोलिसांना संशय; दोन तासांच्या CCTV फुटेजमध्ये…
saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
8th Pay Commission Approved by By Government
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी
Saif Ali Khan Attacked With Knife At Home
Saif Ali Khan Attacked : “सैफ अली खानच्या घरात घुसलेला आरोपी हा…”, डीसीपी गेडाम यांनी दिली महत्त्वाची माहिती

हेही वाचा – चोराने सैफवर हल्ला केल्यावर ‘हे’ दोघे पोहोचले मदतीला; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात

आरोपीची ओळख पटली

या घटनेसंदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. हल्ल्याच्या दोन तास आधीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणीही त्या सोसायटीमध्ये प्रवेश करताना दिसत नाही, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. सैफ अली खानच्या जखमी मदतनीसला उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

हेही वाचा – हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस, पोलिसांना संशय; दोन तासांच्या CCTV फुटेजमध्ये…

“एक आरोपी सैफ अली खानच्या घरात घुसल्याची घटना रात्री घडली. फायर एस्केप पायऱ्यांचा वापर करून तो घरात घुसला होता. हा घरफोडीचा प्रयत्न असल्याचं दिसतंय. या आरोपीची ओळख पटली आहे, आणि सध्या १० टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत,” अशी माहिती तेथील पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली.

हेही वाचा – ५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी

सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या पाच सदस्यांची मुंबई पोलिसांकडून अतिरिक्त माहितीसाठी चौकशी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. सैफ अली खान राहत असलेल्या या सोसायटीत नूतनीकरणाचे काम सुरू होते. या कामासाठी येणाऱ्या मजुरांचीही मुंबई पोलिसांनी चौकशी केली, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिले आहे.

सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी घटनास्थळावरून सर्व पुरावे गोळा केले आहेत, अशी माहिती गेडाम यांनी दिली.

Story img Loader