Saif Ali Khan Attack Latest Updates: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान दरोडेखोराने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. सैफ सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सैफला शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी रूममध्ये हलवण्यात आलं आहे. आता या घटनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मध्यरात्री अडीच वाजता एक अज्ञात सैफ अली खानच्या घरात शिरला. घरातील मदतनीसने त्याला अडवलं, त्यानंतर त्याने तिच्याशी वाद घातला. आवाज ऐकून सैफ तिथे पोहोचला आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने चाकूने सैफवर हल्ला केला. या हल्ल्यात सैफला गंभीर दुखापत झाली. त्याला हाताला व मणक्याला सहा जखमा झाल्या, यापैकी दोन जखमा जास्त खोल असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
Income Tax raid on BJP MLA Harvansh Singh Rathore
भाजपाच्या माजी आमदाराच्या घरात आढळल्या मगरी; भ्रष्टाचार प्रकरणात प्राप्तीकर विभागाने धाड टाकताच अधिकारीही चक्रावले
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
Aamir Khan
“या सीनला लोक…”, ‘दिल’ चित्रपटाच्या वादग्रस्त सीनवरून आमिर खानचे दिग्दर्शकाशी झालेले मतभेद
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
Junaid Khan And Reena Dutta
आमिर खानच्या मुलाला होता ‘हा’ आजार; ‘तारे जमीन पर’ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर झालेली जाणीव, जुनैद खानचा खुलासा

हेही वाचा – “कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया

दरोडेखोराच्या हल्ल्यात सैफची पत्नी करीना कपूर खान व त्यांची मुलं तैमूर आणि जेह सुरक्षित आहेत; मात्र त्यांची मदतनीस जखमी झाली आहे. या घटनेत सैफ व मदतनीस दोघेही जखमी असून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, पण मदतनीसच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती समजू शकलेली नाही.

हेही वाचा – “त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया

सीसीटीव्हीत कोणीच घरात प्रवेश करताना दिसलं नाही

सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हल्ल्यापूर्वीच्या दोन तासांमध्ये घराच्या आवारात कोणीही प्रवेश करताना दिसलं नाही. याचा अर्थ ज्याने सैफवर हल्ला केला तो आधी इमारतीत घुसला होता. सैफवर हल्ला करून पळून गेलेल्या हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. एकूणच घटनाक्रम पाहता सैफच्या घरातील मदतनीस त्या हल्लेखोराला ओळखत असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे; असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

हेही वाचा – Video: एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पोहोचले सैफ अली खानच्या घरी, तपासाचा व्हिडीओ आला समोर

सैफ अली खानचा हल्लेखोर हा घरातील मदतीसच्या ओळखीचा असल्याचा पोलिसांना संशय आहे. मदतनीसनेच त्याला घरात येऊ दिलं असावं, अशी शक्यता आहे. आता पोलिसांना मदतनीसवरही शंका असून ते याचा सखोल तपास करत आहेत. सैफ अली खानच्या घरातील पाच कर्मचाऱ्यांची मुंबई पोलिसांकडून अतिरिक्त माहितीसाठी चौकशी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवासी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला कोणीही सोसायटीत जाताना दिसलं नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांवरचा संशय बळावला आहे.

Story img Loader