९० च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या पूजा भट्टचा आज वाढदिवस आहे. ती प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आणि आलिया भट्टची बहीण आहे. एकेकाळी बॉलिवूडमध्ये तिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा व्हायची. पण तिच्या आयुष्यातील काही वादांमुळेही ती खूप चर्चेत राहिली. आज तिच्या आयुष्‍यातील काही वादांबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कमी वयात दारूचं व्यसन

पूजा भट्टला कमी वयात दारूचे व्यसन लागले होते. त्याचं कारण तिचे वडील महेश भट्ट आणि तिची आई यांच्यातील तुटलेलं नातं होतं. महेश भट्ट यांनी सोनी राझदानशी लग्न केल्यामुळे पूजाला मानसिक धक्का बसला होता. भावनिक आघातातून जात असताना तिने दारू पिण्यास सुरुवात केली, ही सवय तिला अनेक वर्षे सोडता आली नव्हती.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी खरंच राऊतांच्या घरची सून होणार? स्नेहल शिदमने सांगितलं ‘त्या’ फोटोमागचं सत्य, म्हणाली…

न्यूड फोटोशूट

पूजा भट्ट ही खूप बोल्ड अभिनेत्री आहे. तिने ९० च्या दशकात एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते, ज्यामध्ये तिचे शरीर पेंटने झाकले होते. यामुळे पूजा वादात सापडली होती.

जावेद अख्तरांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर व्हिडीओ शेअर करणाऱ्या अली जफरवर संतापले पाकिस्तानी; अभिनेता म्हणाला, “दहशतवादामुळे आपण…”

लग्न मोडलं अन् ब्रेकअपही झालं

पूजा भट्टने २००३ साली व्हिडीओ जॉकी मुनीष माखिजाशी लग्न केलं होतं, पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. २०११ मध्ये दोघे वेगळे झाले. यानंतर तिच्या आयुष्यात रणवीर शौरी आला, दोघांचीही एंगेजमेंट झाली, पण परस्पर वादामुळे त्यांचं नातं तुटलं.

‘त्या’ रोमँटिक फोटोमुळे निखिल बने व स्नेहल शिदमला झाला ‘हा’ मोठा फायदा; अभिनेत्री म्हणाली…

वडिलांबरोबर लिप लॉक आणि लग्नाची चर्चा

पूजाने एका मासिकासाठी वडिलांबरोबर फोटोशूट केले होते. तज्यामध्ये दोघांनी लिप किस केले होते. बाप-लेकीच्या या पोझची खूप चर्चा झाली होती. तसेच पूजा आपली मुलगी नसती तर तिच्याशी लग्न केलं असतं, असं वक्तव्य महेश भट्ट यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे महेश भट्ट यांच्यावर बरीच टीका झाली होती.

पूजा भट्टने तिच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं. तिने १९८९ मध्ये ‘डॅडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर तिने ‘सडक’, ‘सर’, ‘हम दोनों और चाहत’ सारख्या चित्रपटात काम केलं. ‘दिल है की मानता नहीं’ आणि ‘जख्म’ हे तिचे सुपरहिट चित्रपट होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja bhatt birthday know about controversy lip kiss with mahesh bhatt divorce nude photoshoot hrc