७ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला तमिळनाडूमधील कन्याकुमारीपासून सुरुवात झाली. त्यांच्या या यात्रेमध्ये काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रेला दक्षिण भारतामध्ये मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे असे म्हटले जात आहे. दरम्यान या यात्रेमुळे राहुल गांधी यांना निरनिराळ्या स्तरावरुन पाठिंबा मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोरंजन विश्वामधील काही सेलिब्रिटींनी देखील भारत जोडो यात्रेला पाठिंबा दाखवला आहे. काही दिवसांपूर्वी स्वरा भास्करने या यात्रेबद्दलचे मत सोशल मीडियावर व्यक्त केले होते. चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री पूजा भट्टने नुकताच राहुल गांधींच्या यात्रेमध्ये सहभाग घेतला होता. राहुल आणि त्यांच्या समर्थकांसह ती हैदराबादमधल्या रस्त्यांवर चालल्या. तेव्हाचे फोटो ट्विटरवर पोस्ट करण्यात आले आहेत. पोस्ट केल्यानंतर लगेच हे फोटो व्हायरल झाले.

आणखी वाचा – “मीडिया ट्रायलने…” पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या राज कुंद्राने सोडलं मौन

तिने हे फोटो रिशेअर करत त्यांना “हो. आम्ही आज १०.५ किमी चाललो”, असे कॅप्शन दिले आहे. या कृतीमुळे तिचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अभिनेत्री गौहर खानने या पोस्टखाली ‘पूजा भट्ट आम्हाला तुझा अभिमान वाटतो’, असे लिहिले. एका यूजरने ‘बॉलिवूडमधल्या एका कलाकाराने का होईना हिंमत दाखवली’, अशी कमेंट केली आहे. काहीजणांनी भारत जोडो यात्रेमध्ये भाग घेतल्यामुळे तिला ट्रोल देखील केले आहे.

आणखी वाचा – नीना गुप्ता यांना करायचाय सलमान खानशी रोमान्स; म्हणाल्या, “मला त्याच्याबरोबर…”

१९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सडक’ या चित्रपटामुळे पूजा भट्टला प्रसिद्धी मिळाली होती. मध्यंतरी ती मनोरंजन विश्वापासून लांब होती. २०२० मध्ये या चित्रपटाचा रिमेक ‘सडक २’ तयार करण्यात आला होता. या सिक्वेलच्या निमित्ताने त्यांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह सनी देओल, दुलकर सलमान आणि श्रेया धन्वंतरी अशा कलाकारांनी काम केले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja bhatt has reshared rahul gandhis bharat jodo yatra photos yps