एक यशस्वी अभिनेत्री व चित्रपट निर्माती अशी ओळख असलेली पूजा भट्ट नुकतीच ‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये दिसली होती. पूजाने आता एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल, तसेच तिने वडिलांबरोबर लिप किस करून १९९० साली एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं, त्यानंतर झालेल्या वादावर भाष्य केलं.
“दुसरी आई बनून तिने…”, वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मोठ्या बहिणीबद्दल बोलला गश्मीर महाजनी
पूजाने एका मासिकासाठी वडील महेश भट्टबरोबर फोटोशूट केले होते. ज्यामध्ये दोघांनी लिप किस केले होते. बाप-लेकीच्या या पोझची खूप चर्चा झाली होती. याबाबत पूजा सिद्धार्थ कननशी बोलताना म्हणाली, “दुर्दैवाने त्या क्षणांचे अनेकांकडून चुकीचे वर्णन केले गेले. शाहरुख खाननेही मला हेच सांगितलं होतं. हा एक निष्पाप क्षण कॅप्चर केला होता ज्याचे खूप वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. ज्याला जे करायचंय ते करतात. मी इथे बसून त्याचा बचाव करणार नाही. जर कोणी वडील व मुलीच्या नात्याबद्दल असे प्रश्न उपस्थित करत असतील तर ते कितीही वाईट विचार करू शकतात.”
चाहत्याने थेट छत्रपती संभाजी महाराजांशी केली तुलना, गश्मीर महाजनी म्हणाला, “माझ्यात त्यांच्या…”
वडिलांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपल्याला सांगितलं होतं, असं पूजाने नमूद केलं. महेश यांनी सोनी राझदानशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा पालकांनी तिला बसवून सगळं सांगितलं. तसेच घटस्फोट खूप सामान्य आहेत, असंही ते म्हणाले होते. तिचे पालक कधीही मुलांशी किंवा एकमेकांशी खोटं बोलत नाहीत, असं पूजा म्हणाली.
दरम्यान पूजा भट्टच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने तिच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं. तिने १९८९ मध्ये ‘डॅडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर तिने ‘सडक’, ‘सर’, ‘हम दोनों और चाहत’ सारख्या चित्रपटात काम केलं. ‘दिल है की मानता नहीं’ आणि ‘जख्म’ हे तिचे सुपरहिट चित्रपट होते.