पूजा भट्ट ‘बिग बॉस ओटीटी २’मुळे बरीच चर्चेत आली. शोमध्ये ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच कामाबद्दल बोलताना दिसली. फक्त शोमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही पूजा खूप स्पष्टवक्ती आहे. पूजा महेश भट्ट यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. आपल्या वडिलांनाच कीस करतानाचं फोटोशूट केल्याने ९० च्या दशकात पूजा भट्टवर प्रचंड टीका झाली होती. आपल्या बोल्ड इमेजमुळे पूजा कायम चर्चेत असते.
नुकतंच पूजाने तिच्या इनस्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या वडिलांचा अपमान करणाऱ्या एका नेटकऱ्याला चांगलेच खडसावले आहे. पूजाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोवर एका नेटकऱ्याने ७० च्या दशकात महेश भट्ट यांच्या परवीन बाबीबरोबरच्या अफेअरबद्दल भाष्य केलं.
आणखी वाचा : आधी ‘जवान’ची उडवली खिल्ली आता पाहायचा आहे पहिला शो; विवेक अग्निहोत्री यांनी केलं चित्रपटाचं कौतुक
त्या नेटकऱ्याने कॉमेंटमध्ये लिहिलं, “तुला ठाऊक आहे का की तुझे वडील कहाण्या सांगायचे की परवीन बाबी अर्धनग्न अवस्थेत रात्री त्यांच्या मागे धावायची. या कहाण्या सांगून त्यांचा कोणता हेतु साध्य होतो. जी व्यक्ती असं करू शकते तिने आपल्या अहंकारापोटी तुझ्या शरीराचा वापर केला नसेल हे कशावरुन? फार मोठी विडंबना आहे. लोक आपल्या अहंकारापोटी इतरांच्या भावनांशी खेळत आहेत.”

या ट्रोलरला पूजाने अत्यंत समर्पक असं उत्तर दिलं आहे. पूजा त्याला कॉमेंटमध्ये म्हणाली, “देव तुमचं भलं करो. डोळ्यावर पट्टी बांधून एखाद्याचा दुस्वास करण्याची तुमची ही वृत्ती नष्ट होवो अशी देवाकडे प्रार्थना करते. माझ्या सदिच्छा कायम तुमच्याबरोबर आहेत. ” ट्रोलर्सचं अशा रीतीने तोंड बंद करणाऱ्या पूजा भट्टच्या या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीझनमुळे पूजा भट्ट चर्चेत आली होती.