प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी व अभिनेत्री पूजा भट्ट वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पूजा भट्ट ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये सहभागी झाली आहे.  मध्ये सहभागी झाली आहे. त्यामध्ये तिने तिच्या लग्नाबाबत मोठं भाष्य केलं होतं. ११ वर्षांनंतरही तिचा संसार का मोडला याचं कारण पूजानं सांगितलं होतं. आता तिनं तिच्या प्रेम प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. पूजा आणि बॉलीवूड अभिनेता रणवीर शौरी रिलेशनशिपमध्ये होते. पण काही वर्षांनंतर दोघांचं ब्रेकअप झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- Video: दीपिका पदुकोण-रणवीरच्या मुंबईतील ११९ कोटींच्या नव्या घराची पहिली झलक समोर, पाहा व्हिडीओ

एका मुलाखतीत पूजा भट्टने रणवीर शौरी यांच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. पूजा व रणवीर काही वर्षं नात्यात होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअप झालं. पूजानं त्यांच्या ब्रेकमागील कारण सांगितलं आहे. ती म्हणाली की, “रणवीरला दारूचं व्यसन होतं आणि त्यामुळे दोघांमध्ये खूप भांडण झालं. त्यानं मला अनेकदा मारहाणही केली होती. त्यानंतर आमचं ब्रेकअप झालं.”

हेही वाचा- डोंगर, झाडी आणि बरंच काही …! करण देओल व द्रिशा आचार्यच्या हनिमूनचे फोटो व्हायरल

दुसरीकडे रणवीर शौरीनं खुलासा केला होता की, पूजा भट्ट त्यांच्या नात्यादरम्यान त्याचा गैरवापर करत होती. तिनं अनेकदा मला घाणेरड्या शिव्या दिल्या असल्याचे रणवीर म्हणाला. पूजाबरोबर ब्रेकअप केल्यानंतर महेश भट्टनं त्याला काम न देण्याची धमकी दिली होती. दोघांनी एकमेकांबरोबर साखरपुडाही केल्याची चर्चा होती.

हेही वाचा- शाहरुख खान, प्रिती झिंटानंतर आता संजय दत्तचीही क्रिकेट विश्वात एन्ट्री; ‘हा’ संघ केला खरेदी

पूजा भट्टनं भारतीय व्हीजे व मुंबईतील रेस्टॉरंटमालक असलेला मनीष माखिजा याच्याबरोबर लग्न केलं होतं. पहिल्या भेटीतच मनीष व पूजा चांगले मित्र बनले होते. फक्त दोन महिने डेट केल्यानंतर त्यांनी २००३ मध्ये लग्न केलं. पण, लग्नाच्या ११ वर्षांनंतर दोघांनी २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. रणवीर शौरीबद्दल सांगायचं तर, त्यानं २०१० मध्ये अभिनेत्री कोंकणा सेनशी लग्न केलं; पण २०२० मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja bhatt talks about her love life and brekup with actor ranvir shorey actoress said he beating me dpj