१७ जूनपासून ‘बिग बॉस ओटीटी २’ला सुरुवात झाली. पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक खुलासे होताना दिसत आहेत. घरातील स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इतर स्पर्धकांशी चर्चा करताना दिसत आहेत. अभिनेत्री पूजा भट्टदेखील ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये सहभागी झाल्यामुळे सध्या चर्चेत आहे. नुकतंच तिने या शोदरम्यान स्वतःच्या लग्नाबद्दल खुलासा केला.
ही गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक असेल की पूजा भट्ट ही आधी सलमान खानच्या घरात सून म्हणून जाणार होती. असं म्हंटलं जातं की पूजा भट्ट सलमान खानचा भाऊ सोहेल खानबरोबर एका सीरियस रिलेशनशीपमध्ये होती. मीडिया रीपोर्टनुसार या दोघांनी लग्न करायचंही निश्चित केलं होतं, पण असं घडलं नाही. याबद्दल पूजा भट्टने एका जुन्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : “यांना परमेश्वरही…” मराठा मंदिर चित्रपटगृहाचे मालक मनोज देसाई ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर संतापले
१९९५ मध्ये ‘स्टारडस्ट’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूजा भट्टने सोहेल खानबरोबरच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. पूजा भट्ट आणि सलमान खान यांच्यात बेबनाव असल्यामुळे हे नातं पुढे जाऊ शकलं नाही असं पूजाने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. पूजा म्हणाली, “मी त्यांच्या कुटुंबाच्या फारच जवळ होते, मला त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्ति आवडते. तिथे कुणीही तुम्हाला प्रश्न विचारत नाही. माझ्या घरात जसं वातावरण आहे अगदी तसंच वातावरण त्यांच्या घरात आहे. मला त्यांचे वडील फार आवडतात. माझ्या मनात त्या सगळ्यांबद्दल आदर आहे. त्यांची आईदेखील खूप प्रेमळ आहे.”
सलमानचा एक चित्रपट करण्यास पूजाने नकार दिला होता तेव्हापासूनच या दोघांचे संबंध बिघडले असंही पूजाने या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. आता मात्र हे दोघे एकमेकांचे अत्यंत चांगले मित्र आहेत. पूजा भट्टच्या या मुलाखतीनंतर तीन वर्षांनी म्हणजेच १९९८ मध्ये सोहेलने सीमा सजदेहशी लग्न केलं तर पूजा भट्टनेही २००३ मध्ये मनीष मखीजाशी लग्नगाठ बांधली.