पूजा हेगडे ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनयाचा ठसा उमटवत पूजाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली. आता पूजा ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात ती बॉलिवूड अभिनेता सलमान खानसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

पूजा हेगडेने नुकतीच एका इफ्तार पार्टीला हजेरी लावली. काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत पूजा दिसून आली. यावेळी पूजाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये पूजा खूपच ग्लॅमरस दिसत होती. परंतु, इफ्तार पार्टीतील पूजा ड्रेस नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला नाही. या ड्रेसवरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

हेही वाचा>> Video : चिमुकल्याचा डान्स पाहून अंकुश चौधरी भावुक, डोळे पाणावले अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन इफ्तार पार्टीतील पूजा हेगडेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी पूजाच्या ड्रेसची खिल्ली उडवली आहे. “इफ्तारसाठी सभ्य ड्रेस घालायला हवा होता,” असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “पूजा या ड्रेसमध्ये तू छान दिसत आहेस. पण, इफ्तारसाठी दुसरा ड्रेस घालून यायला हवा होता,” अशी कमेंटही केली आहे.

pooja-hegde-troll

“प्रत्येक धर्माचा आदर करायला शिका. असे कपडे घालून यायला ही डान्स पार्टी नाही, इफ्तार पार्टी आहे,” असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. “कदाचित पहिल्यांदाच इफ्तार पार्टीत आली आहे. म्हणून चुकीचा ड्रेस घातला आहे,” अशी कमेंटही केली आहे.

हेही वाचा>> Video : चिमुकल्याचा डान्स पाहून अंकुश चौधरी भावुक, डोळे पाणावले अन्…; व्हिडीओ व्हायरल

pooja-hegde-troll

“ही इफ्तार पार्टी आहे अवॉर्ड फंक्शन नाही,” असंही म्हटलं आहे.

pooja-hegde-troll

हेही वाचा >> ‘कबीर सिंग’मध्ये वनिता खरातबरोबर काम केल्यानंतर ‘अशी’ होती शाहीद कपूरची प्रतिक्रिया, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली “सीन शूट झाल्यानंतर…”

दरम्यान, सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात पूजा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या २१ एप्रिलला हा चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader