अभिनेत्री पूजा हेगडेने बॉलीवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून जगभरात आपली ओळख निर्माण केली. आपल्या व्यावसायिक आयुष्याबाबत जेवढी ती उघडपणे बोलते तितकंच आपलं वैयक्तिक आयुष्य तिला खासगी ठेवायला आवडतं. अशातच पूजा हेगडे तिच्या कथित बॉयफ्रेंड रोहन मेहराबरोबर पुन्हा एकदा दिसली. वांद्रे येथे एकत्र फिरताना पापाराझींनी त्यांचे फोटोज काढले, त्या वेळेस दोघंही एकाच कारमध्ये होते.

यावेळी पूजानं सफेद रंगाचा शर्ट, ग्रे ट्राउजर व काळे बूट घातले होते; तर रोहननं काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळी पॅन्ट व सफेद शूज, असा कॅज्युअल लूक केला होता. पूजा हेगडे गेल्या काही दिवसांपासून रोहनला डेट करीत असल्याची चर्चा सुरू आहे. रोहन दिवंगत अभिनेते विनोद मेहरा यांचा मुलगा आहे. रोहननं २०१८ मध्ये सैफ अली खानबरोबर ‘बाजार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. रोहनचं नाव याआधी तारा सुतारियाबरोबर जोडलं गेलं होतं. तथापि, मे २०१९ मध्ये दोघे विभक्त झल्याची माहिती समोर येऊ लागली.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच

२०२३ मध्ये पूजा एका क्रिकेटरला डेट करत आहे आणि लवकरच ती त्याच्याशी लग्न करणार आहे अशा चर्चांना उधाण आलं होतं. तथापि, ‘द फ्री प्रेस जर्नल’नं दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीनं या अफवा खोडून काढल्या आणि जाहीर केलं की, त्या खोट्या आहेत.

दरम्यान, पूजाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर पूजा सलमान खानबरोबर ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी व विनाली भटनागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आगामी चित्रपट ‘देवा’मध्ये ती दिसणार आहे. त्यात शाहीद कपूरबरोबर अभिनेत्रीच्या भूमिकेत ती झळकणार आहे. ‘देवा’ हा एक ॲक्शनपॅक्ड थ्रिलर चित्रपट आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या निमित्तानं हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्याशिवाय पूजाचा अहान शेट्टीबरोबर ‘सनकी’ चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader