अभिनेता सलमान खान ज्या नवीन अभिनेत्रींबरोबर काम करतो, त्यांच्याशी त्याचं नाव जोडलं जातं. सध्या तो ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री पूजा हेगडे झळकणार आहे. या दोघांच्या डेटिंगच्या चर्चाही खूप सुरू होत्या. अखेर पूजा हेगडेने सलमान खानला डेट करण्याबद्दलच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सलमान खानला विराट कोहलीच्या फिटनेसची भुरळ, पण आवडता क्रिकेटपटू दुसराच; नाव सांगत म्हणाला…

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या रिलीजच्या आधी पूजाने सांगितलं की ती सिंगल आहे तिचे करिअर हीच तिची प्राथमिकता आहे. सलमान आणि पूजा हेगडे यांच्या डेटिंगच्या अफवा काही महिन्यांपूर्वीच सुरू झाल्या होत्या. दोघांपैकी कोणीही दावे नाकारले नव्हते किंवा स्वीकारलेही नव्हते. सलमान पूजा हेगडेचा भाऊ ऋषभ हेगडे याच्या लग्नाला मंगळूरला गेल्यावर या चर्चा आणखी वाढल्या. या लग्नातील काही फोटोही व्हायरल झाले होते.

लहानपणी वडिलांना गमावलं, आर्थिक संकटामुळे उपाशीपोटी काढले दिवस अन्…; आता सलमानच्या चित्रपटात झळकणार अभिनेता

को-स्टार सलमान खानला डेट करण्याच्या चर्चांबद्दल विचारले असता पूजा हेगडेने या सर्व अफवा फेटाळून लावल्या. ती ‘ई-टाइम्स’शी बोलताना म्हणाली, “मी माझ्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी वाचत असते. पण मी सिंगल आहे व मला सिंगल राहणं आवडतं. मी सध्या माझ्या करिअरवर मनापासून लक्ष केंद्रित करत आहे. कामानिमित्त मी एका शहरातून दुसर्‍या शहरात जाण्याचे प्रयत्न करत आहे, हेच माझे सध्याचे ध्येय आहे. मी आता या अफवांबद्दल प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही.”

दरम्यान, ‘किसी का भाई किसी की जान’ या फरहाद सामजी दिग्दर्शित चित्रपटात व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, शहनाज गिल, पलक तिवारी, विजेंदर सिंग, राघव जुयाल, जस्सी गिल, भूमिका चावला आणि सिद्धार्थ निगम यांच्याही भूमिका आहेत.